सोलापूर : , पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली सोलापूर शहर प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक शासकीय विश्रामगृहात मंगळवारी संपन्न झाली. या बैठकीत आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा झाली. दरम्यान शहराचे निरीक्षक शेखर माने यांनी बोलताना शहरात सभासद नोंदणी बाबत चिंता व्यक्त केली, शहरात जर संथगतीने काम होत असेल तर अवघड आहे, दर रविवारी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे मला नोंदणीबाबत विचारतात मी काय उत्तर द्यायचे असा प्रश्न उपस्थितांना केला..
शेखर माने यांच्या भाषणानंतर शहराचे कार्याध्यक्ष संतोष पवार तातडीने उठले त्यांनी सभासद नोंदणी वर स्पष्टीकरण देताना आपली भूमिका स्पष्ट केली जवळपास अठराशे पुस्तक त्यामाध्यमातून वीस हजार सभासद नोंदणी नव्याने होणार असल्याचे सांगितले

















