जमीर लेंगरेकर
एन के पाटील
सोलापूर महापालिकेतील उपायुक्त जमीर लेंगरेकर यांची मुंबईला प्रमोशनने उपायुक्त नगर परिषद संचालनालय मध्ये बदली झाली आहे. जमीर लेंगरेकर यांच्या जागेवर मोहोळ नगर परिषदेचे मुख्याधिकारी एन के पाटील यांना सोलापूर महापालिकेत उपायुक्त म्हणून बढती मिळाली आहे, पंढरपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी व प्रभारी जिल्हा प्रशासन अधिकारी अनिकेत मानोरकर यांनाही प्रमोशन मिळाले आहे त्यांची मुंबई नगर परिषद प्रशासन संचालनालयच्या उपायुक्त पदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या नगरविकास विभागाचे अवर सचिवांनी शुक्रवारी सायंकाळी हे आदेश काढले आहेत.
जमीर लेंगरेकर हे 2020 साली कोरोनाच्या काळात सोलापूर महापालिकेत जॉईन झाले होते, त्यांच्याकडे सामान्य प्रशासन विभाग होता, महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांच्या मर्जीतील अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे.
लेंगरेकर यांनी बदली झाल्यानंतर सर्व सोलापूरकरांचे आभार व्यक्त केले आहेत.