सोलापूर – पालिकेच्या प्रशासकीय कामकाजाचा मधील चोर के दाढी मे तींका असणारा अधिकारी कोण ? ही चर्चा सध्या महापालिकेच्या वर्तुळात चांगलीच रंगलेली आहे.
महापालिका म्हणजेच मी याच विर्भावामध्ये वावरणारा तो अधिकारी पालिकेमध्ये मनमानी करत सुटलाय. शास्त्रशुद्ध भाषेमध्ये बोलून सर्वांना संभ्रमित करत आपला हेतू साध्य करत सुटालाय.कागदांवर शब्दांचे घोडे नाचवत पालिका आयुक्तांना भुरळ पाडली आहे. आयुक्तांच्या सहानुभूतीचा फायदा घेत मनमानी पद्धतीने याने आपल्या जवळच्या लोकांची मलईदार टेबलांवर नियुक्ती केली आहे.अशा घटनांमधून तो आपले उखळ पांढर करत सुटलाय आहे.
या मनमानी उपायुक्तांच्या गैर कारभाराविरोधात आता शिवसेनेनं बंड पुकारले आहे.पालिकेतील सत्ताधारी आणि विरोधी गटाच्या नगरसेवकांनी शिवसेनेच्या बंडाला पाठिंबाच दिला असून कामगार संघटनांनी तर यासाठी रस्त्यावर उतरण्याच्या इशारा दिला आहेत. पहा कामगार नेते व नगरसेवक काय म्हणतात हा व्हिडीओ 👇👇👇


















