स्त्रीच सौंदर्य हे निसर्गाचे तिला मिळालेली देणगी आहे.ते पुढे जोपासून ठेवणे व त्याची अजून देखभाल करणे हे तिची जबाबदारी आहे.प्रत्येक व्यक्तीला सुंदर दिसण्याची हाऊस असते.त्यांने त्यांचा आत्मविश्वास वाढतो . आता नेमके छान दिसणे म्हणजे आपल्या डोक्यात काय येते ? नाक डोळे रेखीव असणे ,केस लांब आणि दाट असणे ,उंची आणि बांधा छान असणे व त्वचा टवटवित असणे . चेहऱ्याची काया ही सुंदर असली की आकर्षक वाटते.चेहऱ्यावर कुठले दाग ,धब्बे किंवा कसले व्रण नसले की ती खूप सुंदर दिसते .पण तरुणपणात जिथे सुंदरतेचे महत्व जास्त असते तेव्हा बरेच जणांना मुरूम फुटायला लागतात. मुरूम हे केसांचे फॉलिकल किंवा मुळाकडे जास्तीच तेल किवा सीबम गोळा होऊन त्यात जंतूच संक्रमण होऊन पसरणारे आजार. विशिष्ट हे की ज्यांची त्वचा तेलकट आहे अशा त्वचा वर जास्त आढळून येते .मुरूम साधारणतः १५-१६ वर्षा पासून सुरुवात होऊन ते २४/२५ वर्षा पर्यंत हळूवार नियंत्रणात येते . व त्यानंतर नाहीसे होतात . त्वचात प्रत्येक केस बाहेर पडण्यासाठी एक छिद्र असते .त्या छिद्र मध्ये केसांचे मूळ असतात ज्यांच्या अजूबाजूला sweat glands असतात. जेव्हा ह्या केसांच्या मूळात खूप तेल साठवतात ,वरचे छिद्र बुजते आणि त्यात जंतूच संक्रमण सुरू होते . जस जस तेल,घाम आणि जंतूच संक्रमण वाढते तसे मुरूम मोठे होऊन अजूबाजूला पसरायला लागते .
मुरूम कोणत्या कोणत्या प्रकारचे असतात ते आता पाहुयात .
कमोडॉम्स किंवा व्हाइट आणि ब्लॅक हेडस, जे नाकावर कपाळावर हणवटीवर आढळून येते .हे छोटे छोटे दाने असल्यासारखे दिसतात. व त्यातून पांढरे किंवा काळे चिकट द्रव्य निघत असते,दुसऱ्या प्रकार मध्ये एखादा दुसरा मुरूम गालावर किंवा कपाळावर येते ते हात लावले की दुखते ह्याला सोम्य प्रकारचा मुरूम किंवा mild मुरूम म्हणतात, जेव्हा पूर्ण चेहऱ्यावर छोटे मोठे मुरूम फुटतात त्याला मध्यम स्वरूपाचे मुरूम म्हणतात ह्यात जंतू / बॅक्टरिया असल्याने ते हाताने फोडण्यास चेहऱ्यावर पसरते, जेव्हा चेहरा , पाठ आणि हातावर खूप प्रमाणात मुरूम फुटतात त्याला अतिशोक्त प्रमाणातले मुरूम किंवा सिवीअर मुरूम म्हणतात, ह्यामध्ये लाल मेवाज भरलेले प्रदूषित मुरूम असतात जे फोडण्यास किंवा फुटल्यास तिथे मुरूमाचे व्रण किव्हा खड्डे पडतात जे कायम राहतात .
नोडूलार मुरूम आणि सिस्टीक मुरूम ह्यात मोठे मोठे मुरूम असतात ज्या मध्ये खूप प्रदूषित रक्त आणि जंतू संक्रमित असतात.
मुरुमाचे इलाज
कमोडोम्स / सोम्य प्रकारचे मुरूम बरेच वेळा घरातले उपचाराने कमी होणे शक्य आहे .
जशी सॅलिसीलिक फेस वॉशने चेहरा किमान ३ वेळा धुवून केस अठवड्यातून २/३ वेळा धूने व केस चेहऱ्यावर न आणता बरेच वेळा डँड्रफ असल्याने पण कपाळावर आणि चेहऱ्यावर मुरूम फुटतात.ताज्या फळांचे सेवन,चेहऱ्यावर तेल आणि घाम आल्यास नेहमी पुसत राहणे.
तेलकट बेस क्रीम व फाऊंडेशन न वापरणे ,त्वचेला स्वच्छ आणि मोकळा श्वास घेण्या योग्य ठेवणे पण जिथे मध्यम ते सिव्हियर मुरूम आहेत तिथे मेडिकल सहायताची गरज असते .
अशा वेळेस उपचार आणि औषधाने हे मुरूम आवाक्यात आणणे शक्य होते .अशा वेळेस क्लीन अप, लेझर द्वारे जंतूचा नाश ,त्वचाच्या पॉलिसिंगनी बंद असलेले पोर / छिद्र हे उघडून त्यातले तेल आणि इन्फेक्शनला बाहेर पडण्यास मदत होते ,
पिंपळ पील हे वरची त्वचा पिल करून पोर किंवा छिद्र खुले करून पिंपल्स कमी करण्यात सहाय ठरतात
त्या सोबत औषधे, रेटीनो क्रीम, गोळ्या, व अँटी बायोटिकची मदत घ्यावी लागते .हळूहळू हे मुरूम आवाक्यात येतात .
काही औषधे किंवा लेप चेहऱ्यावर कमी प्रमाणात तेल बनवण्यात सहाये करते .ज्याने करून पोर बंद नाही होत आणि मुरूमाचे प्रमाण बनण्याचे कमी होते .
काही वेळेस मुरूम फुटतात तिथे डाग सोडतात .अशा वेळेस केमिकल पिलसच सहायाने मुरूमाचे डाग कमी करता येईल .
मध्यम ते सीव्हीयर मुरूम असल्यास किमान ३-४ महिने तरी उपचार चालू ठेवावा लागतो .
मुरूम होण्याचे मुख्य कारण पाहू यात
जंतू च संक्रमण ,चेहरा ला हात लावून मुरूम फोडल्याने ते पसरत राहते. हार्मोन्स च तरुण वयात होत असलेले शरीरात बदल पोर/ त्वचा च छिद्र बंद होणे, अति प्रमाणात घाम आणि चेहऱ्यावर तेल सुटत राहणे ,
अस्वच्छ त्वचा ,डँड्रफ, खूप साखर आणि बेकरी चे पदार्थ सेवन ,तरुण वयोगट ,अति प्रमाणात तेलकट खाणे ,आनुवंशिक .
त्यामुळे हे आजार जर जास्त असल्यास योग्य तज्ज्ञ ला भेट देऊन डॉक्टर कढून उपचार घेणे हे योग्य इलाज असेल.
डॉक्टर स्वप्नजा कटेकरी
या २२ वर्षा पासून दांत ,त्वचा व केस सौंदर्य उपचार व कॉस्मेटिक शस्त्रक्रियेमध्ये खात्रीपूर्वक जनतेला सेवा देत आहेत. त्यांचे क्लिनिक जुना गांधी नगर सोलापूर , आकुर्डी पुणे ,सांगोला ,पंढरपूर , औंगाबाद येथे आहेत .त्यांचा appointment साठी दूरध्वनी क्रमांक 90043350118/ 9156728879 वर संपर्क करू शकता .





















