सोलापूर जिल्ह्याचा विस्तार पाहता भारतीय जनता पक्षाचे आता दोन जिल्हाध्यक्ष झाले आहेत. त्याच धर्तीवर सोलापूर लोकसभेचा विचार करता काँग्रेस पक्षाने दुसरा जिल्हाध्यक्ष नेमावा, त्यामुळे इतर कार्यकर्त्यांना न्याय मिळेल आणि जिल्ह्यात काम करायला मुभा मिळेल अशी मागणी शहराचे अध्यक्ष चेतन नरोटे यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पाटोळे यांच्यासमोर पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत केली.
शहराध्यक्ष यांनी केलेल्या मागणीनंतर ग्रामीण कार्यकर्त्यांमधून आता नाराजीचा सूर आहे. जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील यांची बाजू घेत तालुकाध्यक्ष आणि कार्यकर्त्यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन चेतन नरोटे यांच्या मागणीला विरोध केला आणि उलट पक्षश्रेष्ठींनी नरोटे यांना ताकीद द्यावी अशी मागणी केली. शहराध्यक्षांना जिल्हाध्यक्ष नेमण्याची मागणी करण्याचा अधिकार काय असाही प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. नरोटे यांना समज द्यावी त्यांनी जिल्ह्याच्या कारभारात इंटरफेअर करू नये अशा भूमिकेत ग्रामीणचे दिसले.
ज्यावेळी नरोटे यांनी मागणी केल्यानंतर त्या बैठकीत या मागणीला कोणीही विरोध केला किंवा कुणी आक्षेप घेतला नसल्याचे सांगण्यात येते मात्र आता पत्रकार परिषद घेऊन सात तालुकाध्यक्षांनी विरोध केला आहे. त्यामध्ये सोलापूर शहरातील वरिष्ठ उपाध्यक्ष विजयकुमार हत्त्तुरे यांचा पुढाकार दिसून आला. यावरून हत्तुरे यांचा एवढा इंटरेस्ट का असाही प्रश्न आता काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित करत आहेत.
ग्रामीण मध्ये काम करणारे काही पदाधिकारी आमदार प्रणिती शिंदे यांच्या कार्यपद्धतीवर नाराज असतात ते नकळत त्यांना कायमच विरोध करत आले असतात. अशाच एका अती उत्साही कार्यकर्त्यांने काही महिन्यापूर्वी आमदार ताईंच्या कार्यपद्धतीवर विरोध करत काँग्रेस भवन समोर उपोषण केले होते. त्या कार्यकर्त्याचे असे प्रकार वाढल्याने ते प्रकरण वरिष्ठ पातळीवर गेले होते. यामुळे सुशीलकुमार शिंदे यांनी त्याला बंगल्यावर बोलून चांगलेच झापले. आणि त्यांना हाकलून लावले, शेवटी ते कार्यकर्ते पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात गेले. काँग्रेस पक्षात ताजे उदाहरण आहे.