किरीट सोमय्याच्या व्हिडिओमुळे तमाम महाराष्ट्रीयन माणसाची मान खाली गेली आहे.याचा निषेध म्हणून मोहोळ येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात ठाकरे गटाच्या शिवसेना महिला आघाडीच्या वतीने किरीट सोमय्या याच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन करण्यात आले.
यावेळी जिल्हाप्रमुख सीमा पाटील यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. किरीट सोमय्या याची अश्लील व्हिडिओ क्लिप पाहून तमाम महिलांमध्ये संताप व्यक्त केला जात असताना यावर नवनीत राणा, चित्रा वाघ, रूपाली चाकणकर, नीलम गोरे, मनीषा कायंदे या महिला नेत्या गप्प का आहेत. पीडित महिलांचा शोध घेऊन त्यांना न्याय दिला पाहिजे व किरीट सोमयावर कठोर कारवाई केली पाहिजे अशी मागणी यावेळी पाटील यांनी केली.
यावेळी महिला आघाडी उपजिल्हाप्रमुख निर्मला डोंगरे, शहर प्रमुख स्वाती गायकवाड, शहर समन्वयक प्रज्ञा माळी, शाखा प्रमुख सुरेखा गायकवाड, सुवर्णा पवार, शिवसेना तालुकाप्रमुख अशोक भोसले, उप तालुकाप्रमुख विनोद आंब्रे, पांडुरंग माळी, प्रकाश पारवे, शिवआरोग्य सेनेचे संग्राम गायकवाड, युवानेते शिवरत्न गायकवाड, युवा सेना तालुकाप्रमुख विजय गायकवाड, वाहतूक सेनेचे सोमनाथ पवार, माजी नगरसेवक चंद्रकांत गोडसे, सुहास आखाडे, प्रदीप माने, हैदर इनामदार, संतोष माळी, गणेश पासले, अविनाश क्षीरसागर, ईश्वर कांबळे, गोरख पवार, बापू पवार बहुसंख्य महिला व शिवसैनिक उपस्थित होते.