सोलापूर : उत्तर सदर बझार लष्कर परिसरात राहणाऱ्या चार जणांनी मिळून तू वफ्फ बोर्डाच्या अधिकाऱ्याला का भेटला असे म्हणून चाकूने हल्ला करून युवकाला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना सोमवार 27 सप्टेंबर रोजी घडली. अब्दुल रजाक नजीर अहमद शेख (वय 34, रा. घर नं. 252, उत्तर सदर बझार लष्कर फलटन मशीदच्या जवळ सोलापूर) असे जखमीचे नाव आहे.
सोलापूरात दोन दिवसांपूर्वी वफ्फ बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी येऊन गेले, त्यांनी मुस्लिम समाजातील अडीअडचणी, प्रश्न जाणून घेतले होते या पार्श्वभूमीवर दुसऱ्या दिवशी अब्दुल शेख हे त्याच्या घराच्या बाहेर आले असताना ईस्माईल महिबुब शेख, अब्दुल अजीज शेख, ताजोद्दीन आबादीराजे व इतर दोन या सर्वजणांनी मिळून तू वफ्फ बोर्डाच्या अधिकाऱ्यांना भेटायला का गेला?
आमच्या विरूध्द पोलीसांकडे तक्रार करतो का असे म्हणून डोक्यात चाकू, तलवार आणि काठीने हल्ला करून मारहाण केले तसेच पत्नीच्या गळ्यातील सोन्याचे हार ओढले आणि ढकलून दिले अशी फिर्याद अब्दुल रजाक शेख याने सदर बझार पोलीस ठाण्यात दिली त्यावरून पोलीसांनी आरोपी विरूध्द गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गायकवाड करीत आहेत.

















