सोलापूर-गावरान फिल्म प्राँऊडन्स निर्मित चांडाळ चौकडीच्या करामती या वेब सिरीजनेअख्ख्या महाराष्ट्राला अक्षरशः जणू वेड लावले, अस्सल गावरान बोली भाषेत विनोदाचे कारंजे उडवत या टीमची सुटलेली सुसाट एक्स्प्रेस महाराष्ट्रात समाजप्रबोधनासाठी ‘माईलस्टोन’ ठरत असून यामधील प्रबोधन डोळसांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारे आहे,असे गौरवोद्गार सरपंच परिषदेच्या सोलापूर जिल्हा महिला अध्यक्षा कविता घोडके – पाटील यांनी काढले.
दरम्यान यावेळी त्यांनी या गावच्या सरपंच दुर्गा शिंदे यांच्या कामाचे व गावच्या वैभवाचे कौतुकदेखील त्यांनी यावेळी केले.चांडाळ चौकडीच्या करामती या वेब सिरीज कलाकारांची भेट घेतली. यादरम्यान घोडके-पाटील यांनी या टीमशी संवाद साधला.
या वेळी रंगलेल्या गप्पांच्या मैफीलमधून टीमच्या यशस्वी प्रवासाचे पदर उलगडले.या प्रसंगी वाळूजच्या सरपंच प्रियंका खरात होत्या.
वेबसिरीजमध्ये बाळासाहेबाची भूमिका वठवणारे भरत शिंदे व त्यांच्या सुविद्य पत्नी कंळबेश्वर गावच्या विद्यमान सरपंच दुर्गाताई शिंदे या दाम्पंत्याचा तसेच वेबसिरीजमधील अन्य पात्रे रामभाऊ, सुभाषराव, आण्णा बनसोडे, सुभानराव सुजल पवार आदी कलाकारांचाही यथोचित सन्मान करुन या टिममधीलसर्व कलाकारांना भविष्यातील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
महाराष्ट्राला वेड लावलेल्या चांडाळ चौकडीच्या करामती ही अस्सल गावरान विनोदी बेवसिरीज असली तर या प्रत्येक भागांमध्ये या टीमने समाज प्रबोधन केले आहे.व्यसन हे विषाणू संकट आहे.निर्मळ जीवन जगले पाहिजे.महिलांचा आदर करा, स्वच्छतेचे महत्त्व शासकीय, ग्रामपंचायत कर वेळेत भरले पाहिजेत हे सांगितले.आज चांडाळ चौकडीच्या करामती या बेव सिरीजचा 95 वा
भाग आज लाँचीग करण्यात आला. तर लवकरच 100 भाग व्हावेत सिनेमा देखील रुपेरी पडद्यावर यावा.तर टीव्ही.मालिकेतून रसीक प्रेक्षकाचे असेच मनोरंजन प्रबोधन करा आपला लौकिक सातासमुद्रापार जाईल अशा शुभकामना व्यक्त करण्यात आल्या.
या प्रसंगी टीमने देखील नाटक अभिनय आणि वास्तव वेगळे तर पडद्यावरील जीवन वेगळे असल्याचे सांगितले.आम्ही सर्व कलाकार सामाजिक बांधिलकी समजुन या क्षेत्रात काम करीत असून रसिकांच्या प्रेमामुळे आम्हास स्फूर्ती, प्रेरणा मिळत असल्याचे या कलाकारांनी सांगितले.


















