सोलापूर : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे शुक्रवारी सोलापूर दौऱ्यावर होते, त्यांनी शिवस्मारक याठिकाणी पत्रकार परिषद घेतली. यावेळी आमदार सुभाष देशमुख, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सचिन कल्याणशेट्टी, खासदार डॉक्टर जयसिध्देश्वर स्वामी, शहराध्यक्ष विक्रम देशमुख, आमदार राम सातपुते हे उपस्थित होते.
यावेळी पत्रकारांनी स्थानिक विकासाचे प्रश्न केले, दुहेरी जलवाहिनी असेल, स्मार्ट सिटीची कामे असतील, उड्डाण पूलचे विषय, विमान सेवेचा विषय यावर आपले स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्यात समन्वय नाही, कधीही एकत्रित बसत नाहीत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ड्रीम प्रोजेक्ट वर कामे होत नाहीत, भाजपचे हे कसले विकासाचे धोरण? अशा प्रश्नावर आमदार खासदारांचे चेहरे पाहण्यासारखे होते, बावनकुळे यांनी सर्वांना सांभाळून घेताना आजच्या पक्षाच्या बैठकीत हे विषय निश्चितच घेतले जातील, विषय कुठे थांबले आहेत, राज्य सरकार किंवा केंद्र सरकारकडे काही थांबले का? असे उत्तर दिले. पहा हा व्हिडिओ…




















