सोलापूरात आमदार गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थितीत अक्कमहादेवी मंदिर, स्टेट बक कलनी, भवानी पेठ सोलापूर येथे ओबीसी आरक्षणबाबत घोंगडी बैठकीचे आयोजन संजय कणके यांनी केले होते.सध्या सोलापूर शहर, महाराष्ट्र राज्य तसेच भारत देशामध्ये कोरोना संसर्गजन्य रोगाचे अनुषंगाने रोगाचा प्रतिबंध व होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजनेचा एक भाग म्हणून सोलापूर शहरामध्ये सोलापूर महापालिका आयुक्त यांच्या आदेशाने सकाळी 7 वा पासून पुढील आदेश होईपर्यंत दररोज सायंकाळी 5 पर्यंत जमावबंदी व सायंकाळी 5 नंतर संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे. याची जाणीव असताना देखील आमदार गोपीचंद पडळकर हे कार्यक्रमास सायंकाळी 18.40 वा चे सुमारास आले व आयोजक संजय कणके, प्रकाश कारंडे, संजय पूजारी, राजु बंडगर, संतोष कारंडे, प्रकाश आनंदकर, रवि हक्के, सचिन पाटील, समर्थ माशाळकर, अजय रुपनर, शरणु हंडे, प्रशांत परदेशी, बिपीन पाटील, प्रथमेश आनंदकर, प्रकाश आनंदकर व इतर 10 ते 15 कार्यकर्ते असे मिळून घोंगडी बैठक घेऊन आयुक्त, सोलापूर महानगरपालिका, सोलापूर यांचे आदेशाचे उल्लंघन करून लोकांची गर्दी करून, सोशल डिस्टन्सींग न ठेवता लोकांचे जिवीतास धोका निर्माण होईल असे कृत्य केले आहे. याप्रकरणी जोडभावी पेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तसेच आमदार गोपीचंद पडळकर यांचा गाडीवर भला मोठा दगड फेकून काच फोडणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता अमित सुरवसे यांच्या विरुद्ध ही जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



















