सोलापूर महानगरपालिकेची अंदाजपत्रकीय सभा शुक्रवारी होती ही सभा अण्णाभाऊसाठे नागरी वस्ती सुधार योजनेच्या निधीवरून चांगलीच गाजली अनुसूचित जाती प्रवर्गातून निवडून आलेल्या अनेक नगरसेवकांची यादीतून नावे वगळल्याचा या सभेत आरोप झाला नगरसेविका श्रीदेवी फुलारे नगरसेविका सुनिता रोटे नगरसेवक आनंद चंदनशिवे नगरसेविका पूनम बनसोडे नगरसेविका नूतन गायकवाड हे या सभेमध्ये आक्रमक दिसून आले एकीकडे असं गोंधळाचं चित्र सुरू असताना दुसरीकडे या गोंधळातच खंडणी गुन्ह्यात जामीन झालेले उपमहापौर राजेश काळे यांनी सभेला हजेरी लावली ते गुपचुप उशिरा का होईना महापौरांच्या बाजुला आपल्या खुर्चीवर येऊन बसले मात्र त्यांच्या चेहऱ्यावर गॉगल होता, जॅकेट होते, काळे यांना खुर्चीवर पाहतात सर्वांच्या चेहर्यावर हसू आले, याच वेळी महापालिकेच्या सभागृहात दुसऱ्या एका चेहऱ्याने सर्वांचे लक्ष वेधले आणि चर्चा सुरू झाली हे नगरसेवक इथे कसे काय त्यांच्यावर तर काही दिवसापूर्वीच दोन वर्षासाठी तडीपारीचा आदेश निघाला आहे ते नगरसेवक होते भाजपचे सुनील कामाठी. सुनील कामाठी यांनी ही चेहऱ्यावर काळा गॉगल घातला होता त्यांनी गोंधळातच सभेला हजेरी लावून बहुतेक सही करून ते निघून गेले त्यानंतर दहा मिनिटेच आपल्या उपमहापौरपदाच्या खुर्चीवर बसून रजिस्टर मध्ये सही करून राजेश काळे यांनी ही सभागृहातून काढता पाय घेतला. कामाठी सभेला कसे आले याची सभागृहात माध्यम प्रतिनिधींमध्ये चर्चा सुरू झाली, दरम्यान चौकशी केली असता तडीपार नगरसेवक सुनील कामाठी यांनी पोलीस आयुक्त अंकुश शिंदेंची परवानगी घेऊनच सर्वसाधारण सभेला हजेरी लावल्याची माहिती मिळाली.