सोलापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती दिवस म्हणजे सामाजिक न्याय दिन. यानिमित्ताने आॕल इंडिया समता सैनिक दल सोलापूर शहर व जिल्ह्याच्यावतीने इयत्ता 10 वी व 12 वी मध्ये उत्तीर्ण झालेल्या सर्व समाजातील विद्यार्थीचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून कास्ट्राइब शिक्षक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष श्रीशैल कोरे, सोमनींग कोळी, भिमदल सामाजिक संघटना संस्थापक शशिकांत कांबळे, डॉ किर्तीपाल गायकवाड, समता सैनिक दल सोलापूर जिल्हा प्रमुख वैशाली उबाळे तसेच समता सैनिक दल जिल्हा अध्यक्ष रमेश वाघमैतर,अमोल रामनवर मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांना शैक्षणिक साहित्य देण्यात आले.
उपस्थित प्रमुख पाहुण्यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीच्या शुभेच्छा देताना ऑल इंडिया समता सैनिक दलाच्या या उपक्रमाचे कौतुक केले.
प्रारंभी कार्यक्रमाचे प्रास्ताविक वैशाली उबाळे यांनी करताना कार्यक्रमा मागील उद्देश स्पष्ट केला. सूत्रसंचालन जी. टि.गायकवाड यांनी केले तर आभार रमेश वाघमैतर यांनी मानले या कार्यक्रमास ऑल इंडिया समता सैनिक दल सोलापूर जिल्हा व शहर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

















