सोलापूर ते अक्कलकोट या नूतन तयार करण्यात आलेल्या राष्ट्रीय महामार्गावर 50 टक्के कामे पूर्ण झाले असताना टोल नाका सुरू करण्यात आला आहे. 40 किलोमीटर अंतराच्या रस्त्यावर दोन टोल सुरू करण्यात येत आहेत.याच्या निषेधार्थ काँग्रेस आणि प्रहार संघटनेच्या वतीने सोलापूर-अक्कलकोट या मार्गावरील वळसंग येथील टोल नाक्यावर मोर्चा काढण्यात आला.
काँग्रेसचे माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे व प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष दत्ता मस्के यांनी नेतृत्व केले. स्थानिक नागरिकांना मासिक पास देण्यात यावा. येथील शेतकऱ्यांना शेतात जाण्या-येण्यासाठी रस्ता सोडण्यात यावा. चुकीच्या पद्धतीने सर्व्हिस रोड ची निर्मिती करण्यात आली आहे. ती व्यवस्थित करावी. पाण्याचा निचरा होण्यासाठी बांधण्यात येणाऱ्या नाल्याची अर्धवट कामे पूर्ण करावेत.आदी मागण्या करण्यात आल्या.
टोल नाक्यावर बंदोबस्त साठी युवक ठेवण्यात आले आहेत त्यावर बोलताना म्हेत्रे यांनी गुंडगिरीची भाषा आमच्या समोर नको, त्यामुळे असले धंदे बंद करा, जिल्ह्याला गिळून टाकणारी लोक इथं आहेत, त्यांनी जर लक्ष घातले तर लोक ही राहणार नाहीत आणि टोल पण राहणार नाही. दरम्यान काय म्हणाले म्हेत्रे पहा व्हिडीओ
















