खेळाडूंना ‘आयपीएल’मध्ये खेळण्यास बंदी घालावी : ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार अॅलन बॉर्डर
मुंबई : इंडियन प्रीमियर लीगपेक्षा (आयपीएल) ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला खेळाडूंनी प्राधान्य देण्याची नितांत आवश्यकता आहे. राष्ट्रीय क्रिकेट मंडळांनी आपल्या खेळाडूंना ‘आयपीएल’मध्ये खेळण्यास बंदी घालावी, असे आवाहन ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार अॅलन बॉर्डर यांनी केली आहे.
”ट्वेन्टी-२० लीग म्हणजे खेळाडूंना भरमसाट पैशांची कमाई करून देणारे व्यासपीठ आहे. त्यामुळेच मला त्या आवडत नाहीत. स्थानिक लीगपेक्षा जागतिक स्पर्धाना महत्त्व देण्याची गरज आहे. ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे स्थान अग्रेसर आहे. त्यामुळेच ‘आयपीएल’मध्ये खेळण्यास मंडळांनी खेळाडूंना मज्जाव करावा,” अशा शब्दांत बॉर्डर यांनी विविध क्रिकेट लीगवर ताशेरे ओढले आहेत.