सोलापूर शहर हे दुसऱ्या टप्प्यात असल्याने महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी रविवारी नवे आदेश काढले यामध्ये आता सोलापूर शहरातील सर्व दुकाने दिवसभर उघडण्याचा निर्णय झाला आहे तसेच इतर काही बाबींसाठी अजून निर्बंध आहेत नेमके काय आहेत महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांचा आदेश पहा
सोलापूर महानगरपालिका क्षेत्राकरीता सुधारीत आदेश पारित करण्यात आलेले होते. परंतु शासनाने नव्याने आदेश पारित केलेले आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारी यांनी सोलापूर महानगरपालिका क्षेत्रात स्तर-२ प्रमाणे शिथिलता देण्यास मान्यता दिलेली आहे. सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर यांनी सोलापूरला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार व देण्यात आलेल्या सुचनेनुसार कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखणेकामी प्रतिबंधात्मक उपाययोजना अंतर्गत दि. ०७/०६/२०२१ सकाळी ५.०० वाजलेपासून ते पुढील आदेश होईपर्यंत खालीलप्रमाणे सुधारीत आदेश निर्गमित केले आहेत.
अत्यावश्यक सेवेत देणारी दुकाने नियमितपणे, बिगर अत्यावश्यक सेवेत देणारी दुकाने नियमितपणे, मॉल थेटर्स मल्टिप्लेक्स सिंगल स्क्रीन व नाट्यगृह हे हे 50 टक्के क्षमतेने सुरू राहतील, उपहारगृह रेस्टॉरंट हे 50% क्षमतेने सुरू राहतील, सार्वजनिक ठिकाणी मोकळी मैदाने नियमितपणे सुरू राहतील, खाजगी कार्यालय शासकीय कार्यालय 100% क्षमतेने सुरू राहतील, क्रीडा व मैदाने सकाळी पाच ते सकाळी नऊ पर्यंत सायंकाळी पाच ते रात्री नऊ पर्यंत सुरू राहणार आहेत, नेमबाजी नियमितपणे सुरू राहील, सांस्कृतिक व सामाजिक मनोरंजन कार्यक्रम हे 50% क्षमतेने सुरू ठेवण्याचा आदेश आहे, विवाह समारंभ यांना 50 लोकांच्या उपस्थित परवानगी देण्यात आली आहे, अंत्यसंस्कार 20 लोकांच्या मर्यादेत होणार आहेत, बैठका, सभा, निवडणुका या 50 टक्के क्षमतेने राहणार आहेत, बांधकाम कृषी ई-कॉमर्स हे नियमितपणे सुरू राहतील.
यापुर्वीच्या निर्बंधात शिथिलता देऊन “नियमिपणे” दैनदिन व्यवहार कोरोना विषयक सर्व सुचनांचे व शासनाने वेळोवेळी घालून दिलेल्या कोरोना विषयक प्रतिबंधात्मक उपाययोजनेचे तंतोतंत पालन करणे अनिवार्य असेल. तसेच सर्व संबधीत दुकानदार/व्यावसायिक / उदयोजक यांनी सोलापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून कोरोना चाचणी केलेला छापील ICMR क्रमांक असलेला वैद्यकिय अधिकारी यांच्या स्वाक्षरीचा व विहित मुदतीचा RAT/RT PCR Negative Report किंवा लसीकरण प्रमाणपत्र सोबत बाळगणे आवश्यक राहील.
या बाबींव्यतिरिक्त अन्य बाबींसाठी सोलापूर महानगरपालिकेकडील यापूर्वी वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश / मार्गदर्शक सूचना पूढील आदेशापर्यंत लागू राहतील.



