सुधारित ब्रेक द चेन अंतर्गत राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी आदेश काढले आहेत राज्यात रेस्टॉरंट्स, हॉटेल्स, शॉपिंग मॉल्सला रात्री १० वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. यात राज्यात सर्व ठिकाणी आता रेस्टॉरंट्स, हॉटेल्सला ५० टक्के क्षमतेनं रात्री १० वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी १५ ऑगस्टपासून होणार आहे, याबाबत शासन निर्णय तर झालाच आहे मात्र अधिकृत माहिती सुद्धा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. दरम्यान सुधारित आदेश कशा पद्धतीचे आहेत मी कोणासाठी आहेत ते पहा
























