दत्त चौक ते भागवत टॉकीज कडे चौपाड मार्गे जाणारा रस्ता अत्यंत खराब झाला असून तो लवकर दुरुस्त करावा अन्यथा जन आंदोलन उभे करावे लागेल असा इशारा विरोधी पक्षनेते अमोल शिंदे यांनी पालिका आयुक्तांना समवेत पाहणी दरम्यान दिला..
दत्त चौक ते भागवत थिएटर कडे चौपाड मार्गे जाणारा रस्ता अत्यंत खराब झाला आहे. नवी पेठ, मोबाईल मार्केट येथे जाणारा मुख्य रस्ता असून मोबाईल खरेदी करण्यासाठी रोज हजारो लोक येतात. अतिशय नादुरुस्त अशा परिस्थितीत असताना वारंवार लोकांच्या तक्रारी येत आहेत. अशी परिस्थिती झाली आहे कि या रस्त्या वरून चालता येत नाही. लोकाला आपला जीव हाताच्या मुठीत घेऊन जावा लागतो. या रस्त्याची पाहणी महापौर श्रीकांचना यननम, पालिका आयुक्त पि शिवशंकर, सभागृह नेते शिवानंद पाटील, विरोधी पक्ष नेते अमोल शिंदे, यांनी केली.
यावेळी शिंदे चौक, चौपाड यासह दत्त चौक ते भागवत थिएटर मार्गाची पाहणी करण्यात आली यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष अमर कुलकर्णी, पैलवान नवनाथ बनने, व्यापारी मनोज डिगे, सोमनाथ ताजणे, आदींसह स्थानिक नागरिक उपस्थित होते.
स्मार्ट सिटी अंतर्गत रस्त्याचे काम सुरू आहे ते काम पूर्णत्वाकडे येत असून उर्वरित लागणारा निधी तरतूद करून रस्त्याचे काम पूर्ण करून घेऊ असा विश्वास पालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी व्यक्त केला.
यावेळी स्थानिक नगरसेवक म्हणून अमोल शिंदे यांनी रस्त्याची कामे लवकर झाली नाहीत तर स्थानिक नागरिकांना समवेत तीव्र आंदोलन उभा करू असा इशाराच या पाहणी वेळी दिला.
👇👇👇👇👇👇👇

















