सोलापूर – सिईओ दिलीप स्वामी यांनी हातात कुदळ घेऊन सांडपाणी व्यवस्थे साठी शौषखड्डा खणला….! निमित्त होते सुजलाम अभियानाचे….!
मंगळवेढा तालुक्यांतील ब्रम्हपुरी येथे जिल्हा परिषद शाळेस भेट देऊन स्वच्छ सुंदर शाळेची पाहणी केली. प्राथमिक शिक्षकांनी शाळेचा चेहरा मोहरा पुर्ण बदलला आहे. स्वच्छतेचे संदेश व विविध शैक्षणिक उपक्रमांनी बोलक्या झालेल्या भिंती अन् हिरवागार परिसर.. मुलांना हात धुणेसाठी वाॅशबेसीन ची व्यवस्था , मुलामुलींसाठीही स्वतंत्र शौचालय व मुतारीची व्यवस्था, अशा रम्य परिसर पाहून गावकरी ही आनंदीत झाले.
परिसरांत वाॅशबेसीन मध्ये पडणारे पाणी जमिनीत मुर्त लक्षात असल्याचे लक्षात आले नंतर सिईओ स्वामी यांनी कुदळ आणायला सांगितली. तात्काळ सरपंचाना खड्ड्यांचे पुजन करायला लावून हातात कुदळ घेऊन सांडपाणी व्यवस्थेसाठी खड्डा खणायला सुरूवात केली.
*आमदार ही झाले भावुक* ….!
……………………………
सोलापूर ला निघालेल्या आमदार समाधान दादा आवताडे यांना ब्रम्हपुरी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लोकवर्गणीतून स्वच्छ सुंदर झाली असल्याचे समजताच त्यांनी शाळेकडे गाडी वळवायला सांगितली. शाळेचे काम पाहून तेही भारावून गेले. सिईओ दिलीप स्वामी यांचे संकल्पना बद्दल व शिक्षक व ग्रामस्थांनी घेतलेल्या मेहनती बद्दल त्यांनी अभिनंदन केले. यावेळी आमदार समाधान आवताडे यांचे हस्ते वृक्षारोपन करणेत आले. या प्रसंगी आमदार समाधान दादा आवताडे,दामाजी शुगरचे संचालक राजन पाटील, उप मुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, उप मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, गटविकास अधिकारी सुप्रिया चव्हाण, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, विस्तार अधिकारी नरळे सरपंच मनोज पुजारी,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विजयसिंह पाटील , शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष सिध्देश्वर कोकरे, गटशिक्षणाधिकारी पी के लवटे , शिक्षण विस्ताराधिकारी बी डी पांढरे, केंद्रप्रमुख विष्णू धोत्रे ,माजी केंद्रप्रमुख श्याम सरगर, ग्रामसेवक संजय शिंदे , शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य, ग्रामपंचायत उपसरपंच सदस्य यांच्या उपस्थितीत पार पडला ब्रम्हपुरी शाळेचा कौतुक सोहळा…पार पडला.
*शाळा पाहून विद्यार्थी झाले अचंबित*..!
…………
सध्या कोरोनामुळे शाळा बंद असलेमुळे पाहणी साठी आलेल्या सिईओ दिलीप स्वामी यांनी सात विद्यार्थ्यांना बोलावून घेणेस सांगितले. विद्यार्थी प्रथमच दोन वर्षात आलेनंतर त्यांना शाळा आपलीच आहे का यावर विश्वास बसेना. आलेल्या विद्यार्थ्यांचे आनंदीत चेहरा पाहून सिईओ दिलीप स्वामी यांनी गाडीतील पाचशे वह्या आणायला सांगितले. वह्याचे वाटप विद्यार्थ्यांकडे करून उर्वरीत वह्या शिक्षकांकडे सुपूर्द केल्या.
*सिईओंनी सत्कार नाकारला*. ..!
………………………
विद्यार्थ्यांच्या चेहरा वरील आनंद हाच माझा सत्कार आहे. मी सत्कार स्विकारणार नाही उलट माझे सत्कारा निमित्त आलेल्या गाडीतील पाचशे वह्या वाटप करणार असल्याचे सांगून त्यांनी विद्यार्थ्यांना वह्याचे वाटप केले.
















