सोलापूर : महाराष्ट्र राज्य आरोग्य कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष व आरोग्य सहायक वाय पी कांबळे, फार्मसिस्ट दिनेश नन्ना यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त सन्मान करण्यात आला. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संतोष नवले यांनी निवृत्ती दिवशीच पेन्शन ऑर्डर या दोन्ही कर्मचाऱ्यांच्या हातात दिली.
दरम्यान जिल्हा आरोग्य विभागातील कर्मचार्यांना सेवानिवृत्तीदिवशीच पेन्शनचे आदेश मिळणार अशी यंत्रणा तयार ठेवली आहे अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले यांनी दिली.
याप्रसंगी आरोग्य कर्मचारी संघटनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष अरुण खरमाटे, माजी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुनील भडकुंबे, जिल्हा परिषद कर्मचारी युनियनचे राज्य चिटणीस विवेक लिंगराज, झेडपी मराठा सेवा संघ शाखेचे अध्यक्ष अविनाश गोडसे, संजय उपरे, विजया राऊत, रफिक शेख, संतोष मंडलिक, दत्तात्रय कवितके, रोहिणी सुगंधी, अनिल वाघमारे, उत्तरचे माजी सभापती संभाजी भडकुंबे आदी उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना जिल्हा आरोग्य अधिक़ारी डॉ. नवले यांनी आरोग्य कर्मचार्यांचे सर्व प्रश्न सोडविले जात आहेत. निवृत्ती दिनादिशवीच पेन्शन व इतर रकमा मिळण्याची व्यवस्था केली आहे. त्याचबरोबर कर्मचार्यांची मेडिकल बिले व इतर सर्व प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्याचे काम वेगाने सुरू असल्याचे नमूद केले.
कर्मचारी संघटनेचे खरमाटे यांनी कर्मचार्यांच्या प्रश्नाबाबत वाय. पी. कांबळे यांनी चांगला लढा दिल्याबद्दल समाधान व्यक्त केले. 39 वर्षाच्या सेवेत काम करताना आलेल्या आठवणी कांबळे यांनी यावेळी सांगितल्या. प्रास्ताविक विवेक लिंगराज यांनी केले तर सूत्रसंचालन समीर शेख यांनी केले.