Thursday, March 12, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

कोरोना संकटात पोलीस पाटलांचे काम अप्रतिम, आता लसीकरणासाठी पुढे व्हा ; पोलीस अधीक्षक सातपुते

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
17 December 2021
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – संपूर्ण जगात कोरोना वायरसचा तर आता नवा व्हेरियंट ओमीक्रोन संसर्गाचा धसका असून 85 टक्के देशात या व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. यापासून बचाव करण्यासाठी आता त्रिसूत्रीबरोबर चौथेसूत्र दोन वेळा लसीकरण होणे गरजेचे आहे. तर यासाठी गावपातळीवर पोलिस पाटील यांनी नागरीकांशी समन्व़य साधून गाव 100 टक्के लसीकरण करा असे आवहान जिल्हा पोलिस अधिक्षक तेजस्वी सातपूते यांनी केले.

पृथ्वीराज माने युवा मंचच्या वतीने गुळवंची येथे पोलिस पाटील दिनाचे औचित्य़ साधून उत्त़र सोलापूर तालुक्यातील पोलिस पाटीलांचा सन्मान करण्यात आला यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी युवामंचचे मार्गदर्शक पृथ्वीराज माने, सभापती रजनीताई भडकुंबे, गटविकास अधिकारी प्रशांत देशमुख, बाल विकास प्रकल्प़ अधिकारी समाधान नागणे, गटशिक्षणाधिकारी बापूसाहेब जमादार, तालुका आरोग्य़ अधिकारी डॉ. मोहन शेगर, युवा मंच तालुका अध्यक्ष सुनील जाधव व पदाधिकारी उपस्थित होते.

हात धूवा, सामाजिक अंतर पाळा, मास्क़ वापरा या त्रिसूत्रीबरोबर आता एक नव्हे दोन डोस लसीकरण घेणे या चौथ्या सुत्रीचा अवलंब करणे आवश्यक आहे. तरच आपण कोरोना व आता नव्याने ओमीक्रोनसारख्या संसर्गावर मात करु शकणार आहोत. पोलिस पाटील भरती जरी महसूल विभाग करीत असले तर आपण आमच्या पोलिस विभागाशी संलग्ऩ राहून काम करीत आहात. आपण पोलिसही आहात व पाटीलही आहात तेव्हा गाव करील ते राव काय करील, या युक्तीप्रमाणे राव काहीच करणार नाही ते पोलिस पाटील व गावातील नागरीक करु शकतात  आजवर संकटात तुम्ही केलेल काम अप्रतीम आहेच आता लसीकरणासाठी काम करा  असे आवाहन सातपूते यांनी केले. 

गाव पातळीवर नागरीक व प्रशासनातील महत्वाचा दूवा पोलिस पाटील असून गावात सर्वांना  विश्वासात घेऊन लसीकरणासाठी नागरीकामध्ये जागरुकता करा असे युवा मंचचे मार्गदर्शक पृथ्वीराज माने यांनी सांगून पोलिसी धाक दाखवून अवैध व्यवसाय, गुन्हेगारी कमी करता येते. तरीही जिल्हा पोलिस अधिक्षक यांनी ऑपरेशन परिवर्तनाच्या माध्यमातून अवैध व्यवसाय करणाऱ्या कुंटूबाचे मनपरिवर्तन करुन त्यांना चांगल्या मार्गावर आणले पर्यायी व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहन दिले त्यांचा हा पॅटर्न राज्याला दिशादर्शक  असल्याचे माने म्हणाले तर पुढील वर्षी महिला खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी महिला क्रिकेट मॅच भरवा असेही आवाहन केले. 

यावेळी सभापती रजनी भडकुंबे, गटविकास अधिकारी प्रशांत देशमुख बाल विकास प्रकल्प़ अधिकारी समाधान नागणे यांनीही मनोगत व्यक्त़ केले 

आभार सरपंच विष्णू भोसले यांनी मानले. कार्यक्रमास उत्त़र सोलापूर तालुक्यातील सर्व 29 पोलिस पाटील सह कार्यकर्ते, नागरीक, युवा मंच तालुका, ग्रामशाखा पदाधिकारी, मोठया संख्येने उपस्थित होते. प्रारंभी पृथ्वीराज माने युवा मंचचे अध्यक्ष सुनील जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त़ आयोजित उत्तऱ सोलापूर तालुका प्रिमियर लिग – 2021 क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ पृथ्वीराज माने व तेजस्वी सातपुते यांचे हस्ते संपन्ऩ झाला. आयपीएल धर्तीवर आयोजित केलेल्या या क्रिकेट स्पर्धेत 12 संघानी सहभाग घेतला आहे. 

SendShareTweetSend
Previous Post

Breaking | ओबीसी रद्द झालेल्या जागांवर 18 जानेवारीला खुल्या प्रवर्गातून मतदान |

Next Post

Solapur : भारती विद्यापीठ व मध्य रेल्वे यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता अभियानाचे आयोजन

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

Solapur : भारती विद्यापीठ व मध्य रेल्वे यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता अभियानाचे आयोजन

ताज्या बातम्या

सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

10 March 2026
बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

9 March 2026
नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

4 March 2026
प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

27 February 2026
बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

12 February 2026
सोलापुरात दोन आजी माजी आमदारांना पुत्र पराभवाचा धक्का ; एकीकडे मात्र मुलगा मुलगी आले निवडून

सोलापुरात दोन आजी माजी आमदारांना पुत्र पराभवाचा धक्का ; एकीकडे मात्र मुलगा मुलगी आले निवडून

10 February 2026
सासऱ्यासाठी जावयाची अन् मुलीची वडिलांसाठी अशी ऍडजस्टमेंट तर दुसरीकडे आईची मुलीसाठी माघार

सासऱ्यासाठी जावयाची अन् मुलीची वडिलांसाठी अशी ऍडजस्टमेंट तर दुसरीकडे आईची मुलीसाठी माघार

28 January 2026
अक्कलकोट मध्ये भाजपला धक्का ! आनंद तानवडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत

अक्कलकोट मध्ये भाजपला धक्का ! आनंद तानवडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत

22 January 2026

क्राईम

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
15 December 2025
0

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : मंडल अधिकाऱ्याचे वेतन काढण्यासाठी 40 हजाराची...

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

by प्रशांत कटारे
25 November 2025
0

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका सोलापूर शहर पोलिसांनी टोळीच्या माध्यमातून गुन्हे करणाऱ्या दोन टोळ्यांना एकाच वेळी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

Our Visitor

1971330
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group