सोलापूरच्या काँग्रेस पक्षात एक चेहरा सर्वांचे लक्ष वेधून घेतो, उंच, लंबू, दिसायला हुबेहूब अमिताभ बच्चन यांच्या प्रमाणे, ते म्हणजे नगरसेवक रियाज हुंडेकरी. काँग्रेस मध्ये रियाज भाईंची वेगळीच स्टाईल आहे, 2017 च्या निवडणुकीत भाजप लाट आणि एमआयएमला फाईट देत ते विजयी झाले होते. सुशीलकुमार शिंदे व आमदार प्रणिती शिंदे यांच्या अतिशय मर्जीतील ते कार्यकर्ते आहेत. मुस्लिम समाजात चांगली ओळख, कार्यकर्त्यांचा लवाजमा असतो, या नेत्यांचा रविवारी वाढदिवस. त्यांच्या चाहत्यांनी हा वाढदिवस शनिवारीच साजरा केला, एक दिवस वाढदिवस साजरा करण्यामागे एक कारण होते ते म्हणजे काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे साहेब व आमदार प्रणितीताई हे सोलापूरात होते आणि ते शनिवारी रात्रीच मुंबईला निघणार होते त्यामुळे जनवात्सल्यवर रियाज भाईंच्या चाहत्यांनी भला मोठा केक आणला होता, साहेब आपल्या चेंबरमध्ये बसून होते, ताई एका कार्यक्रमासाठी बाहेर होत्या, काँग्रेसचा धडपडा कार्यकर्ता कोमारो सय्यद यांनी माध्यम प्रतिनिधींची सोय केली होती. ताई आल्या ,साहेब बाहेर आले, आईसाहेब आल्या, सर्वांच्या उपस्थितीत केक कापण्याचे ठरले तेवढ्यात रियाज भाईंच्या व आमदार ताईंच्या चेहऱ्यावर मास्क नव्हता, साहेबांनी ताईंना मास्क घालण्यास सांगितले, मास्क घातल्यानंतर केक कापण्यास सुरुवात झाली. तेव्हा साहेबांनी कितवा वाढदिवस असल्याचे विचारले, हुंडेकरी यांच्या तोंडातून 60 असा आकडा येताच साहेब सुद्धा अवाक झाले, “बापरे, 60 साल के हो गये क्या आप, मगर लगता नहीं” असे म्हणताच उपस्थितांमध्ये हशा पिकला. केक कापला, शुभेच्छा देऊन साहेब, आईसाहेब व ताई आत गेले. नंतर सर्व चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. पहा हे व्हिडीओ



















