केमिकल टॅंकर आणि कंटेनरचा भीषण अपघात
सोलापूर : जिल्ह्यातील मोहोळजवळ केमिकल टॅंकर ( chemical tanker fire) आणि कंटेनरचा भीषण अपघात झाला. अपघातानंतर दोन्ही वाहनांनी पेट घेतला. या भीषण घटनेमुळे महामार्गावरील दोन किलोमीटर अंतरावर वाहनं थांबवण्यात आली आहे.
आज सकाळी मोहोळमधील पिंपरी इथं ही घटना घडली. भरधाव कंटेनर आणि केमिकल टँकरची समोरासमोर धडक झाली. धडक झाल्यानंतर केमिकलने भरलेला टँकर महामार्गावर उलटला. त्यामुळे काही क्षणात त्याने पेट घेतला. टँकरने भीषण भेट घेतल्यामुळे घटनास्थळी कंटेनरही आगीच्या भक्ष्यस्थानी सापडला आहे.