सोलापूर – प्रिसिजन फाउंडेशन संचलित सर्वंकष लैंगिक शिक्षण कार्यक्रम केगाव येथील शाळाबाह्य मुला मुलींना आरोग्य विषयी मार्गदर्शन करण्यातआले. हा उपक्रम प्रेरणा सामाजिक संस्थाचे अध्यक्ष प्रमिला उबाळे यांनी आयोजित केला होता.
यावेळी मुला-मुलींना किशोरवयीन शारीरिक, मानसिक, भावनिक बदल, हिंसाचार, शोषण, सकस आहार, वैयक्तिक स्वच्छता, सार्वजनिक स्वच्छता, मासिक पाळी मध्ये घ्यावयाची काळजी, विविध खेळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. या सेशनसाठी एकूण 70 किशोरवयीन मुली आणि 50 मुले उपस्थित होते.
या शाळाबाह्य मुला मुलींना अडचणीच्या वेळी 100, 112, 1098, 108 यासारख्या टोल फ्री नंबरचा उपयोग कसा करावयाचा ही माहिती देण्यात आली. तसेच सेफ आणि अनसेफ टच याविषयीची माहिती देण्यात आली. अशा धकाधकीच्या जीवनामध्ये कशाप्रकारे मुला-मुलींनी राहायचे, वागायचे याचे प्रशिक्षण देण्यात आले. वरील प्रशिक्षण हे प्रिसिजन फाउंडेशन आणि फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया सोलापूर शाखा मधील कार्यक्रमाधिकारी वीरेंद्र परदेशी आणि प्रेरणा सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा प्रमिला उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कम्युनिटी मोबिलायझर मनीषा वांगीकर, सुरेखा ढवरे, सत्यभामा कांबळे, मल्हारी देढे, सपोर्ट स्टाफ करण खानापुरे आदींचे सहकार्य लाभले. रविवारचा दिवस असला तरी मुला-मुलींनी आनंदाने या कार्यक्रमात उत्सुकता दाखवून, कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.