पंढरपुरात श्री संत ज्ञानेश्वर महाराज, श्री संत तुकाराम महाराज पालकी मार्ग व इतर राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे स्थापना व उद्घाटन कार्यक्रमासाठी केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी व राज्यमंत्री व्ही के सिंग हे पंढरपूर मध्ये असून त्यांनी पांडुरंगाचे दर्शन घेतले यावेळी आमदार प्रशांत परिचारक आमदार समाधान आवताडे हे दोन नेते त्यांच्यासोबत होते दरम्यान गडकरी यांनी आपल्या फेसबुक पेजवरून ही माहिती दिली ते म्हटलंय की,
अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या विठू माऊलीच्या दर्शनाचे आज भाग्य लाभले. आदरणीय पंतप्रधान श्री Narendra Modi जी यांच्या हस्ते आज पंढरपूरमध्ये पालखी मार्गांसह अनेक विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण होत आहे. श्री मोदी जी यांच्या नेतृत्वाखाली देशाच्या समग्र विकासाचे आमचे स्वप्न माऊलीच्या आशीर्वादाने लवकरच पूर्ण होईल हा विश्वास आहे.


















