सोलापूर जिल्हा माहेश्वरी सभाच्या वतीने शनिवारी निर्मलकुमार फडकुले सभागृहात ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉक्टर गिरीश जाखोटिया यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते कृष्ण कोण होता असा व्याख्यानाचा विषय होता यावेळी व्यासपीठावर महापालिकेचे उपायुक्त धनराज पांडे, माहेश्वरी सभेचे पश्चिम महाराष्ट्र मंत्री चंद्रकांत तापडिया, सभेचे जिल्हाध्यक्ष जवाहर जाजू, किरणकुमार राठी, मधुसूदन कालानी यांची प्रमुख उपस्थिती होती. आपल्या दीड तासाच्या व्याख्यानात डॉक्टर जखोटिया यांनी श्रीकृष्णांचे तीन वेगवेगळे रूप ऐतिहासिक पुराव्यासहित उपस्थितांसमोर मांडले.
महाभारतात श्रीकृष्णाला बदनाम करण्याचा प्रयत्न झाला आहे, तो चमत्कारी होता, तो कपटी होता, तो रंगीला होता, त्याला सोळा हजार बायका होत्या असे सादर करण्यात आले आहे. बालकृष्ण, गोकुळाचा कृष्ण आणि गीतेतला कृष्ण यापुढे कुणी जात नाही, खोलात अभ्यास करत नाही, कृष्णनीती काय होती हे कुणी समजूनच घेतली नाही, वाचन केले नाही. कृष्ण हा चमत्कारिक नव्हता तर पराक्रमी, चातुर्वर्ण विरोधक होता महिलांचा सन्मान करणारा होता, समसमान न्याय देणारा होता. श्रीकृष्णाने इंद्राला तीन युद्धामध्ये हरवले आहे इंद्र हा वर्णभेदी होता त्यामुळेच इंद्र श्रीकृष्णाच्या हातून तीन वेगवेगळ्या युद्धात पराभूत झाला आहे. हे सर्व कागदोपत्री पुरावे आहेत.
बहुजनांमधील स्त्री गौरवाची परंपरा कृष्णाने पुढे चालवली आहे, याच कारणामुळे कृष्ण हा महाभारतात पांडवांच्या बाजूने कौरव, द्रोणाचार्य भीष्म, कर्ण विरुद्ध उभा होता, त्यामुळे कृष्ण हा श्रीरामापेक्षा श्रेष्ठ ठरतो. आजच्या युवा पिढीने श्रीकृष्ण अभ्यासावा, त्याची नीती समजून घ्यावे असे आवाहन डॉ जखोटीया यांनी केले.
ऐका डॉ जखोटीया यांचे हे व्याख्यान

















