सोलापूर : जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक शुक्रवारी नियोजन भवन मध्ये होती. तत्पूर्वी पालकमंत्र्यांचे सकाळी 11 वाजता नियोजन भवनात आगमन झाले. यावेळी सोबत ज्येष्ठ आमदार सुभाष देशमुख, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार राजेंद्र राऊत, आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील, माजी आमदार प्रशांत परिचारक यांची उपस्थिती होती.
यावेळी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगातून लावण्यात आलेल्या वेगवेगळ्या स्टॉलचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी काही स्टॉलधारकांनी फोटो काढण्याची विनंती केली. तेव्हा तिथे आमदार राऊत नव्हते तेव्हा पालकमंत्र्यांनी राजाभाऊंना बोलवा असे म्हणताच राऊत आले नंतर त्यांनी फोटो काढला.
या स्टॉलचे उद्घाटन झाल्यानंतर नियोजन भवनाच्या बाहेर कृषी विभागाच्या वतीने सेल्फी पॉईंट ठेवण्यात आला होता. त्या ठिकाणी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी पालकमंत्री विखे पाटील यांना फोटो काढण्याची विनंती केली.
तेव्हा पालकमंत्र्यांच्या बाजूला सुभाष देशमुख व सचिन कल्याणशेट्टी हे दोन आमदार आले. तिथेही पालकमंत्र्यांनी विशेष करून राऊताना बोलवा, आमदार राजा राऊत यांना बोलवा असे त्यांनी सांगितले त्याचवेळी सभागृहात चाललेले राजाभाऊ पळत पालकमंत्री पाटलांजवळ आले आणि त्यांनी सर्वांनी मिळून सेल्फी काढला.



















