सोलापूर : भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते अनेक भ्रष्टाचार उघड करणारे किरीट सोमय्या यांनी सोलापूर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पत्र पाठवले आहे या पत्रामध्ये त्यांनी माहितीच्या अधिकाराखाली काही माहिती मागवली आहे त्यामध्ये त्यांनी…
मौजे टाकळी टें, ता. माढा, जिल्हा सोलापूर येथील व्यायामशाळे संबंधी खालील माहिती आम्हांला देण्यात यावी,
1. मौजे टाकळी टें येथे व्यायाम शाळेचे बांधकाम झाले आहे का? आपल्या दफ्तरी त्याची नोंद आहे का?
2. व्यायाम शाळेचे बांधकाम झाले असल्यास ती कोणत्या गट क्रमांकावर बांधण्यात आली आहे?
3. व्यायाम शाळेच्या बांधकामासाठी ग्रामपंचायतीची परवानगी घेतली आहे का? अर्ज दिला आहे का? अर्ज दिला असल्यास त्याची प्रत आम्हांला द्यावी.
4. माने वस्ती गट क्रमांक ११९ वर कोणते बांधकाम झाले आहे का? आपण त्यांना काम पूर्णत्वाचा दाखला, ताबा पावती दिली आहे का? दिली असल्यास त्याची संपूर्ण माहिती आम्हांस द्यावी.
अशी मागणी केली आहे माढा तालुक्यातील मौजे टाकळी टें येथे ग्रामपंचायत मालकीच्या जागेत व्यायामशाळा बांधण्यासाठी आमदारांचा स्थानिक विकास कार्यक्रम अंतर्गत जिल्हा नियोजन समितीकडून सात लाख रुपये मंजूर करण्यात आले होते. सात लाख मंजूर होऊन इस्टिमेट प्रशासकीय मंजुरी मिळून सुद्धा ग्रामपंचायतीने सुचवलेल्या जागेवर व्यायाम शाळा बांधण्यात आलेली नाही त्यामुळे या कामात भ्रष्टाचार झाल्याची तक्रार अजित विठ्ठल घाडगे, दादासाहेब काळसाईत यांनी भाजप नेते किरीट सोमय्या आणि सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे केली आहे.




















