सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये सध्या एका विशिष्ट समाजावर प्रशासन मेहेरबान झाल्याचं चित्र आहे. अनेक प्रभारी पदे याच समाजाच्या अधिकाऱ्यांना दिली जात असल्याचे स्पष्ट दिसत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या स्वभावाचा अनेक जण गैरफायदा सुद्धा घेत असल्याचे बोलले जाते.
सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये सध्या केवळ एकच चर्चा जोरात आहे, ती म्हणजे एका महिला अधिकाऱ्याच्या नव्याने होणाऱ्या केबिनची. ती महिला अधिकारी ज्याठिकाणी बसते ती केबिन जुनी झाली असल्याने तिला आता पॉश केबीनमध्ये बसायचे आहे. तिने मागणी केली आणि ती एका मिनिटात मान्य झाली म्हणे. तिचे केबिन कसे करायचे यासाठी एक कार्यकारी अभियंता चार कनिष्ट अभियंते त्या कार्यालयात गेले होते. म्हणे तसा आदेशच होता वरून. तासभर हे पाचजण केबिन कसे बनवायचे यासाठी थांबून होते. एवढं कौतूक कशासाठी बाबा अशी चर्चा आता झेडपीत सुरू झाली आहे.
जिल्हा परिषदेमधील समाज कल्याण विभागाचे कार्यालय अतिशय जुनाट आहे, त्यांच्या सुशोभिकरणं करण्यासाठी सध्या निधीची कमतरता आहे. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे यांचा कार्यालयाची दुरुस्ती सुद्धा निधीअभावी त्यांनी थांबवले आहे. तसेच माध्यमिक शिक्षण विभागाचे कार्यालय सुद्धा दुरुस्त केले जात नाही. एकीकडे कोरोना महामारी मुळे वायफळ निधी खर्चावर नियंत्रण असताना एका विभागाच्या महिला अधिकाऱ्याच्या स्वतंत्र केबिन साठी एवढा अट्टाहास का? असा प्रश्न आता उपस्थित केला जात असून या प्रकरणात पदाधिकाऱ्यांनी लक्ष घालावे अशी मागणी जिल्हा परिषदेमध्ये जोर धरू लागली आहे.


















