सोलापूर दि. कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे 43 वे अधिवेशन नागपूरच्या जवाहर विद्यार्थीगृहात पार पडले. अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी कृष्णा इंगळे होते तर उद्घाटन माजी मंत्री डॉ.नितीन राऊत यांच्या हस्ते संपन्न झाले. एसआरपीएफ समादेशक प्रियंका नारनवरे, माजी जिल्हाधिकारी वसंतराव खोब्रागडे, प्रादेशिक उपायुक्त सिद्धार्थ गायकवाड, माजी अप्पर आयुक्त सुधीर मेश्राम, डॉ. चंद्रशेखर मेश्राम, महासंघाचे महासचिव सुरेश तांबे, वरिष्ठ उपाध्यक्ष सुमित भुईगळ,कार्याध्यक्ष गणेश मडावी, मुख्य संघटक राजाराम इंदवे, शिक्षक संघटनेचे कार्याध्यक्ष बी.डी.धुरंदर, सरचिटणीस सतीश कांबळे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी संघटनेमध्ये उत्कृष्ट काम करणारे शिल्लेदारांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.यामध्ये सोलापूर जिल्हा परिषद संघटनेचे जिल्हाध्यक्ष अरुण क्षीरसागर यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते संविधानाची प्रत, शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून सन्मानित करण्यात आले. सोलापूर जिल्ह्यामध्ये संघटना वाढीसाठी खूप महत्त्वाचे योगदान क्षीरसागर यांचे आहे. क्षीरसागर हे सतत कर्मचाऱ्यांचे प्रश्नांसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद व इतर कार्यालयामध्ये नियमित बैठका घेऊन प्रश्न सोडवितात, याची दखल घेऊन यापूर्वी क्षीरसागर यांना ग्रामविकास विभाग मंत्रालय मुंबई यांचेकडून गुणवंत कर्मचारी पुरस्काराने गौरविण्यात आले होते. क्षीरसागर विविध सामाजिक उपक्रम राबवितात आणि क्षीरसागर यांना विविध सामाजिक संघटनाकडून पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. म्हणून यांची दखल घेऊन कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे राज्याध्यक्ष ॲङ कृष्णा इंगळे, कार्याध्यक्ष गणेश मडावी यांनी नागपूर अधिवेशनामध्ये विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात केले. या सत्काराबद्दल क्षीरसागर यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या प्रसंगी सोलापूरातुन कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष मनिष सुरवसे व जिल्हा परिषद शाखेचे कल्याण श्रावस्ती, उमाकांत राजगुरू, चंद्रकांत होळकर, नरसिंह गायकवाड, मकरंद बनसोडे आदि उपस्थित होते.