कार्तिकी एकादशी दिवशी पंढरपूर परिसरामध्ये संचारबंदी
पंढरपूर : राज्य शासनाने विविध जिल्ह्यांच्या जिल्हाधिकार्यांना कार्तिकी एकादशी निमित्त पंढरपूरकडे दिंड्या पाठवू नका, असे आदेश दिले आहेत. कार्तिक वारीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. कार्तिकी एकादशीला वारकऱ्यांना पंढरपूरमध्ये प्रवेश बंद करण्यात आला आहे. यंदाची कार्तिकी एकादशी 26 नोव्हेंबरला आहे, मात्र, कोरोना संसर्ग रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. कार्तिकी एकादशीच्या दिवशी पंढरपूर आणि परिसरातील 8 ते 10 गावांमध्ये संचारबंदी लावण्यात येणार आहे. (State Govt decided to denied entry in Pandharpur for warkaris on Kartiki Ekadashi)
कार्तिकी एकादशीच्या वारीसाठी महाराष्ट्रासह आंध्रप्रदेश, कर्नाटक अशा विविध राज्यातून शेकडोंच्या संख्येने दिंड्या आणि पालख्या पंढरीत दाखल होत असतात.