सोलापूर : सोलापूरच्या सिद्धेश्वर सहकारी कारखान्याच्या को जनरेशनची बांधकाम परवाना नसलेली चिमणी महानगरपालिकेने अखेर पाडली. यानंतर धर्मराज काडादी यांनी या प्रकरणात प्रतिक्रिया देताना नकळत नाव न घेता भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांना त्यांनी लक्ष्य केले होते. त्यानंतर काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी काडादी यांची भेट घेऊन त्यांना समर्थन दिले परंतु त्यांनी भारतीय जनता पार्टीवर टीका करताना येणाऱ्या सहा महिन्यात विमानसेवा सुरू करून दाखवावी असे एक प्रकारे आव्हान दिले.
यानंतर सोशल मीडियावर आमदार प्रणिती शिंदे यांच्या विरोधात “ताई ओ ताई”… अशाप्रकारे यांच्यावर टीका करणारी एक पोस्ट व्हायरल झाली. माजी आमदार विजयकुमार देशमुख यांनी ती पोस्ट शेअर केल्याचे दिसल्यानंतर काँग्रेस कडूनही “मालक ओ मालक” अशा प्रकारे टीका करणारी पोस्ट व्हायरल करण्यात आली. या प्रकरणात धर्मराज काडादी हे बाजूलाच राहिले. काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे आणि भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांच्या कार्यकर्त्यांमध्ये पोस्ट वॉर पेटले आहे.
काँग्रेसचे प्रसिद्ध प्रमुख तिरुपती परकीपंडला यांनी टाकलेल्या पोस्टच्या विरोधात दिवंगत नगरसेवक सुनील कामाठी यांचे समर्थक राजकुमार माने या दोघांमध्ये आता चांगलाच पोस्टवाद सुरू आहे. मागील दोन दिवसांपासून ते दोघे एकमेकांच्या विरोधात पोस्ट टाकत आहेत. परकीपंडला हे काँग्रेसने केलेल्या विकासाची भाषा करतात तर दुसरीकडे राजकुमार माने हे त्यांच्यावर टीका करतात. तर माने हे आमदार विजयकुमार देशमुख हे पालकमंत्री असताना त्यांनी केलेल्या कामाचा लेखाजुका मांडतात तर लगेच तिरुपती हे ते खोडून काढण्याचा प्रयत्न करत आहेत.
यातच राज्यभर एका न्यूज वाहिनीने केलेल्या सर्वेनुसार सोलापुरातील भारतीय जनता पार्टीला विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकत असल्याचा दाखवले आहे ती पोस्ट राजकुमार माने यांनी शेअर केली. त्यावर लगेच तिरुपती यांनी भाजपवर टीका करत असे भोगस सर्व्हे भा करण्याची सवय आहे सांगत उत्तर दिलं आहे. एकूणच चिमणी पडली, विमानसेवा कधी सुरू होईल माहित नाही, धर्मराज काडादी बाजूला राहिले परंतु भाजप आणि काँग्रेसमध्ये चांगलाच पोस्ट वाद सुरू झाल्याचे चित्र पाहायला मिळते आणि यावरून सोलापूरकरांचं मनोरंजन मात्र होत आहे.



















