राष्ट्रवादी काँग्रेसचे दक्षिण सोलापूर तालुका अध्यक्ष सुभाष पाटील यांना जिल्हाध्यक्ष काका साठे यांनी तडकाफडकी पदावरून काढले त्यांच्या जागेवर कुंभारीच्या युवा बिपीन करजोळे याला पद देण्यात आले.
जिल्हा कार्यकारी अध्यक्ष उमेश पाटील यांचा राष्ट्रवादी आपल्या दारी नागरीकांचा जनता दरबार हा कार्यक्रम दक्षिण सोलापूर तालुक्यात मोठ्या उत्साहात सुरू असतानाच सुभाष पाटलांवर ही कारवाई झाली त्यामुळे दक्षिण तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते काका साठे यांच्या कार्यपद्धतीवर कमालीचे नाराज आहेत.
दरम्यान याबाबत प्रतिक्रिया देताना सुभाष पाटील यांनी पक्ष निश्चितच माझी दखल घेईल मात्र पक्षाचा कार्यक्रम ज्या तालुक्यात सुरू होता त्याच अध्यक्षाला काढणे म्हणजे पक्षाचा व कार्यकर्त्याचा अपमान असल्याची प्रतिक्रिया पाटलांनी दिली…


















