सोलापूर : मंगळवारी शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना धक्का दिला. राष्ट्रीय अध्यक्षपद सोडणार असल्याचे जाहीर केले राज्यभरातून कार्यकर्त्यांनी विरोध केला आहे शरद पवार यांनी आपला निर्णय मागे घ्यावा यासाठी जोर लावण्यात येत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे हे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. याच पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद मधील पत्रकारांनी साठे यांची प्रतिक्रिया घेतली असता या विषयावर जास्त बोलणे त्यांनी टाळले. एका दैनिकांमध्ये आलेली प्रतिक्रिया आहे मी दिलेली नाही त्यांनी परस्पर लावल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले.
यावर अधिक बोलताना, पवार साहेबांनी एकदा वक्तव्य केल्यास ते माघार घेत नाहीत हा इतिहास आहे. त्यामुळे ते माघार घेण्याची शक्यता फारच कमी आहे. योग्य वेळ पाहूनच साहेबांनी हा निर्णय घेतला असावा. निश्चितच राष्ट्रवादीचा नवा अध्यक्ष येत्या काही दिवसात निवडला जाईल असे सांगत ‘सुप्रियाताई’ अध्यक्ष झाल्यास त्यांचं स्वागतच आहे असे ते म्हणाले.
दरम्यान आता राष्ट्रीय अध्यक्ष बदलला जाईल जिल्ह्यात काही बदल होतील का? असा प्रश्न केला असता आता जिल्ह्यातही भाकरी फिरवण्याची वेळ आलेली आहे. कोणीही कामाचं नाही, पद घेऊन मिरवायचं काम करत आहेत अशा भाषेत सर्व तालुकाध्यक्षांबाबत नाराजी व्यक्त करताना, एवढे राष्ट्रीय अध्यक्ष विषय मिटू द्या, लवकरच आता संघटनात्मक बदल केले जातील. असे सांगत काका साठे यांनी आपल्या डोक्यावरील टोपी फिरवत स्पष्ट संकेत देऊन टाकले.



















