बळीराम ( काका ) साठे …….
संपुर्ण पश्चिम महाराष्ट्रात ” काका ” या नावाने प्रसिद्ध असणारं रांगड ग्रामीण नेतृत्व …..
कौटुंबिक कसलीही राजकीय ” पार्श्वभुमी ” नसणार ,केवळ आणि केवळ स्वकर्तृत्वावर , स्व हिमतीवर स्वतःच आणि ” वडाळा ” गावच नाव राजकीय आणि सामाजिक क्षितीजावर पोहचवणारं ” आपल्या मातीतल ” अजुनही जमिनीवर पाय असणार नेतृत्व !
वडाळा गावच्या “ग्रामपंचायती “पासुन सोलापुर जिल्हाच्या विकासाच केंद्र असणारी ” जिल्हा परिषद ” काकांनी आपल्या विकासाभिमुख कार्यामुळे स्वतःच नेतृत्व सिद्ध केल.
कॉंग्रेस ( I) पासुन …. राष्ट्रवादी कॉंग्रेस पर्यंतचा वादळरुपी काकांचा प्रवास हा …. फक्त ” शरद पवार ” या सहा अक्षरी झंझावातासोबत होता . मा. शरद पवार साहेबांवरची अगाध निष्ठा आणि त्यांच्या विचाराशी बांधिलकी हेच काकांच्या राजकारणाच गमक आहे. सोलापुर जिल्ह्यातील राजकारणात बळीराम काका एका दीपस्तंभासारखे भासतात .
लहान मुल , विद्यार्थी ,शेतकरी , ग्रामस्थ , शिक्षक , अधिकारी ते राजकीय पुढारी या सगळयांशी तितक्याच आत्मियतेने संवाद करून प्रश्नांची ” उकल ” करणारे हे अस्सल ग्रामीण नेतृत्व आता विधान परिषदेवर गेलच पाहीजे …. त्या साठीच हा पत्र प्रपंच …
उत्तर सोलापुर तालुका … पुर्वी पासुन राखीव . मा.सुशीलकुमार शिंदे यांच्या राजकीय रथाच सारथ्य कृष्णाच्या थोरल्या भावाने म्हणजेच ” बळीरामाने ” केल म्हणुनच देशाला सुशीलकुमारांसारखा हुषार गृहमंत्री मिळाला . ग्रामीण भागातील राजकारणाची नस न नस माहिती असणाऱ्या या नेत्याच्या नावापुढे अजुनही ” आमदार ” ही बिरुदावली का नाही ?हे न उलगडणारं कोड …..
उत्तर सोलापुर तालुक्याचे दुसरे नेते कै. ब्रम्हदेव ( दादा ) माने यांना विधान परिषदेवर संधी देऊन त्यांच्या कार्याचा सन्मान पक्षान केला होता…..
आता वेळ आहे ….. बहुआयामी , पाणीदार नेतृत्वाचा म्हणजेच बळीराम काकांच्या पक्षनिष्ठेचा सन्मान करण्याचा …कारण विधानसभेच्या वेळी संपुर्ण महाराष्ट्रात पक्षांतराची लाट आली होती . राष्ट्रवादी काँग्रेसला तर ” पक्ष घात ” च झाला होता . ज्या पक्षामुळे लोक मोठी झाली त्याच पक्षाला संकट काळात राम राम करून ” श्रीराम ” म्हणणारे एका बाजुला आणि …..
७५ वर्षाचा तरणा बांड , अजुनही अंगावर लाल माती टाकताच शड्डु ठोकणारा हा अवलिया अजुन पवार साहेबांच्या टप्प्यात का नाही ?
पवार साहेबांनी प्रचार सभेचा शुभारंभ सोलापुरातुन केला . तो दिवस आठवा …. स्मृती भवन खचाखच भरलेलं … आणि डोक्यावर किंचित तिरपी टोपी आणि डोळयात प्रचंड आत्मविश्वास असणारे ” काका ” तरुणाला लाजवेल अशा पद्धतीन नियोजन करत होते . काकांच त्या वेळच भाषण पवार साहेबांना उत्साहीत करणारं होत …..
शेवटी एकच म्हणायच … काका कांही मागणार नाहीत … ते त्यांच्या स्वभावात नाही . मला पवार साहेबांना हे पत्र पोहचवता येणार नाही. पवार साहेबांवर व काकांवर प्रेम असणाऱ्या सर्वांना एकच विनंती हे पत्र पवार साहेबांपर्यंत पोहचवा .. कारण ८ दिवसावर विधान परिषद निवडणुक आलीय …. हीच वेळ आहे आपल्या नेतृत्वाचा “सन्मान ” करण्याची…..
मा.पवार साहेब तुम्हालाही हात जोडुन विनंती काकांच्या पक्षनिष्ठेची कदर करा .. . त्यांच वय ७७ आहे . तुम्हीच ७५ व्या वाढदिवसाला आला होतात ही संधी पुन्हा नाही.आपणच काकांना ” आमदार ” करु शकता .
आपलाच
गणेश संजय जाधव
मु पो वडाळा ता उ सोलापुर जि सोलापुर
8805044545
9922242620





















