सोलापूर : माजी आमदार दिलीप माने हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर आहेत, मात्र जिल्हाध्यक्ष काका साठे हेच माने यांना विरोध करत असल्याचे चित्र आहे. उत्तर सोलापूर तालुक्यातील बेलाटी या गावात झालेल्या एका कार्यक्रमात काका साठे यांनी भडकाऊ भाषण केले, त्यांनी आपल्या भाषणात केवळ दिलीप माने यांच्यावरच नाही तर स्वर्गीय ब्रह्मदेवदादा यांनाही टार्गेट केले, 50 वर्ष तुमच्यावर अन्याय होत आहे तो तुम्ही सहन करताय, आम्ही करत नाही आणि करणार पण नाही. असे म्हणून उपस्थित कार्यकर्त्यांना त्यांनी भडकावले.
याच भाषणात त्यांनी पुन्हा उत्तर पंचायत समितीच्या सभापती पदाचा विषय काढला, भाजपच्या सभापतीला हटवायचे ठरले तेव्हा करायचे कुणाला असा विषय आला की सर्वप्रथम रजनी भडकुंबे यांना करायचे ठरले मात्र सभापती पद एक-एक वर्ष असा निर्णय झाला एक वर्ष होऊन गेले पण हरी शिंदे यांना काही सभापतिपद दिले नाही आम्ही दोन वेळा सभापती करण्यासाठी विनंती केली मात्र सभापतिपद दिलं गेलं नाही असे ते म्हणाले. या भाषणाची सध्या चर्चा सुरू झाली आहे. काका साठे यांना नक्की काय साध्य करायचे आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
दरम्यान सभापती निवडीचा विषय जेव्हा आला तेव्हा काका साठे आणि दिलीप माने यांच्यामध्ये कोणताही निर्णय झाला नव्हता. एक वर्ष सभापतीपद रजनी भडकुंबे व एक वर्ष हरी शिंदे यांना सभापती करायचे ठरले नाही, हरीश शिंदे हा काका साठे यांचा कार्यकर्ता नाही तो तर दिलीप माने यांचा कार्यकर्ता होता. दिलीप माने यांनी त्यांना निवडून आणले मग काका साठे यांच्या मागे-मागे फिरून सभापतीपद का मागायचे त्यांनी दिलीप माने यांच्याकडे गेले पाहिजे यावरून काका साठे खोटे बोलत आहेत. पन्नास वर्ष राजकारण करणार्या नेत्याने खोटे बोलून उत्तर तालुक्यातील नागरिकांची दिशाभूल करू नये अशी चर्चा दिलीप माने यांच्या कार्यकर्त्यांमध्ये सुरू झाली आहे.


















