सोलापूर : राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या पाठोपाठ आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे सुद्धा सोलापूर दौऱ्यावर येत आहेत. पवारांप्रमाणे त्यांचाही दोन दिवसाचा दौरा आहे. या दोन दिवसाच्या दौऱ्यात माढा, सांगोला आणि पंढरपूर या ठिकाणी त्यांचे कार्यक्रम आहेत. काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष विजयकुमार हत्तुरे यांनी या दौऱ्याबाबत अधिक माहिती दिली असून पंढरपुरात आयोजित जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यक्रमास पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.


















