उत्तर सोलापूर : मार्डी येथील शेततळ्यातील पाण्यात पडून तीन मुलींचा मृत्यू झाला होता.सेवालालनगर येथील वडजे व मार्डी येथील सोनार या कुटुंबाचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवादल यंग ब्रिगेड प्रदेशध्यक्ष सुदीप चाकोते यांनी दोन्ही कुटुंबाची सात्वंन भेट देत अन्नधान्य किट व आर्थिक मदत दिली. दोन्ही कुटुंबांना चाकोते यांच्याकडून गहू, गो.तेल, चहापत्ती, तांदूळ, व इतर किराणा साहित्य असलेले अन्नधान्याचे किट वाटप करण्यात आले. सोनार कुटुंबाला चाकोते यांनी आर्थिक मदत ही यावेळी दिली.
यावेळी मार्डी सरपंच अविनाश मार्तंडे, विष्णू जगताप, माजी भाजपा जिल्हाध्यक्ष शिवाजी सोनार, वैभव घोडके उपस्थित होते. तुम्ही आपल्या दुःखातून सावरत बाहेर या. कुटुंबाबरोबर तुमची ही काळजी घ्या असे म्हणत दोन्ही कुटुंबाची सात्वन भेट घेत धीर दिला. गोपीनाथ मुंडे अपघातग्रस्त शासकीय योजनेतून या दोन्ही कुटुंबाला शासकीय मदत मिळवून देण्याकरिता प्रशासकीय कामात मदत करण्याची ग्वाही दिली. दोन्ही कुटुंबाची परिस्थिती हलाखीची असून कृषीअधिकारी, तहसीलदार, प्रशासनाने याने काही त्रुटी बाजूला ठेवून मदत देण्यासाठी सहकार्य करावे. व अशा घटना घडू नये याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे असे ही चाकोते म्हणाले.
यावेळी नान्नज ग्रा.पं. सदस्य दिपक अंधारे, शिवाजी आवटे, प्रमोद कोरे, संजय वडजे, मारुती राठोड, माजी उपसरपंच रेवणसिद्ध कापसे, हाजुलाल जहागीरदार, नूरअहमद नालवर, रजाक कादरी, कल्याणराव चौधरी, जिशान सय्यद, चंद्रकांत तिक्के, आकाश तिपरादी नितीन हलसगी, श्रीकांत दासरी , अक्षय बिराजदार, लक्ष्मीकांत वल्लम, पवन जगताप उपस्थित होते.