सोलापूर ! काँग्रेस पक्षात ज्या अपेक्षेने गेलो होतो तिथे पूर्ण अपेक्षा भंग झाल्याने विकासाचा दृष्टिकोन ठेवून राष्ट्रवादीत प्रवेश केल्याची प्रतिक्रिया रियाज मोमीन यांनी दिली.
काँग्रेस पक्षाचे शहर सचिव रियाज मोमिन यांनी शुक्रवारी महेश कोठे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत हा प्रवेश कार्यक्रम झाला या प्रवेशानंतर मोमीन हे शनिवारी सोलापुरात आले असता त्यांची प्रतिक्रिया घेतली असता ज्या अपेक्षेने आपण राष्ट्रवादी सोडून काँग्रेसमध्ये गेलो होतो त्या अपेक्षा पूर्ण झाली नाही तिथं मोठा अपेक्षाभंग झाला असे सांगतानाच विकासाचा दृष्टिकोन ठेवून आपण राष्ट्रवादीत प्रवेश केल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली,