सोलापूर शहर काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी सीए सुशिल बंदपट्टे यांची निवड करण्यात आली.
ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे, प्रदेश कॉंग्रेस कार्याध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे यांच्या शिफारशीनुसार सोलापूर शहर काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी सुशिल बंदपट्टे यांची निवड करुन त्या निवडीचे पत्र शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष प्रकाश वाले यांच्या प्रमुख उपस्थितीत बंदपट्टे यांना देण्यात आले. यावेळी कार्यध्यक्ष संजय हेमगड्डी, मनोज यलगुलवार,उपाध्यक्ष अबांदास गुत्तीकोंडा, अशोक कलशेट्टी, तिरुपती परकीपंडला,मनीष गडदे, हरुण शेख, दत्तात्रय नामकर, बंटी पवार, कुणाल म्हेत्रे, किरण मुदगल, राहुल बले, अमित मुद्दे, अनिल धोत्रे, सतीश अलकुंटे ,अतिश अलकुंटे, विक्रांत भांडेकर, शिवकुमार अलकुंटे ,विजेंद्र धोत्रे, आकाश इटकर, कुणाल भांडेकर राहुल कुलकर्णी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
त्यांच्या निवडीबद्दल माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, प्रदेश काँग्रेस कार्याध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे, शहर अध्यक्ष प्रकाश वाले, यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.


















