सोलापूर : माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे व काँग्रेस भवन येथील अन्य पदाधिकाऱ्यांच्या फलकावर शाई फेकण्याचे काही समाज कंटकांनी जे निंदनीय कृत्य केले होते, त्याचा तपास त्वरित होऊन फरार असलेल्या आरोपी समाजकंटकांना लवकर पकडण्यात यावे व त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी म्हणून सोलापूर शहर उत्तर काँग्रेस मतदार संघाच्यावतीने पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी सोलापूर शहर उत्तरचे समन्वयक सुनील रसाळे, माजी नगरसेवक एन.के.क्षीरसागर, महिलाध्यक्ष हेमा चिंचोळकर, उपाध्यक्ष चक्रपाणी गज्जम, युवक काँग्रेस उपाध्यक्ष बाबुराव क्षीरसागर व महाराष्ट्र राहुल गांधी विचारमंच सोलापूर शहरचे अध्यक्ष शक्ती कटकधोंड आदी उपस्थित होते.
यासंदर्भात पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी या प्रकरणातील आरोपींना दोन दिवसात पकडून त्यांना गजाआड करण्यात येईल व त्यांच्यावर कडक शासनदेखील करण्यात येईल असे आश्वासन दिले.


















