सोलापूर : तेलंगणा राज्याची विधानसभा निवडणूक लागली आहे एकूणच राज्यातील राजकीय वातावरण तापले असून काँग्रेस पक्षाला यंदा या विधानसभा निवडणुकीमध्ये पूर्ण बहुमत मिळेल असे चित्र आहे.
काँग्रेस सेवा दल यंग ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष सुदीप चाकोते यांच्यावर या विधानसभा निवडणुकीत पेड्डेपल्ली या विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे.
दरम्यान चाकोते यांनी पेड्डेपल्ली (तेलंगाना) येथे सर्व 292 बूथ सदस्य, कार्यकर्ते, अध्यक्ष व सर्व मंडळ अधिकारी यांना प्रशिक्षण व मार्गदर्शन केले. कार्यक्रमात 26 गावाचे BRS चे सरपंच व असंख्य कार्यकर्ते यांनी चाकोते यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केले. यावेळेस काँग्रेसचे उमेदवार व भावी आमदार विजय रामराव यांच्यासह माजी आमदार, जिल्हा परिषद अध्यक्ष, सर्व फ्रेंडला अध्यक्ष, नगरसेवक, पंचायत समिती सदस्य सह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.