सोलापूर : अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजनेमध्ये निधी वाटपात जाणीवपूर्वक दुजाभाव केल्याच्या तक्रार घेऊन काँग्रेसचे नगरसेवक प्रवीण निकाळजे तसेच एमआयएमच्या नगरसेविका पूनम बनसोडे यांचे पती अजित बनसोडे हे दोघे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे आले होते, पालकमंत्र्यांनी बराच वेळ सर्वांची निवेदन स्वीकारली, हे दोन नेते पाठीमागे थांबले होते काँग्रेसचे गटनेते चेतन नरोटे यांनी बर्याच जणांची निवेदने देताना पुढाकार घेतला तसेच अनेक कार्यकर्त्यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार घडवून आणला मात्र आपल्याच पक्षाचे नगरसेवक प्रवीण निकाळजे हे पाठीमागे बराच वेळ थांबले आहेत याची जाणीव त्यांना झाली नाही
शेवटी नगरसेवक प्रवीण निकाळजे यांनी पालकमंत्र्यांच्या हातात निवेदन दिले आणि थेट तक्रार करण्यास सुरुवात केली परंतु पालकमंत्र्यांनी सदर निवेदन महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांच्याकडे देत ऐकून घेण्यास तयारी दर्शवली नाही तेव्हा निकाळजे चांगलेच आक्रमक झाले महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांकडून जाणीवपूर्वक आमच्यावर दुजाभाव होतोय नागरी दलित वस्ती सुधारणा योजनेचा निधी हा मागासवर्गीय नगरसेवकांसाठी असताना हा निधी इतर प्रभागात का वळवला जातोय अशी थेट तक्रार निकाळजे यांनी पालकमंत्र्यांकडे केली पहा निकाळजे काय म्हणाले…….




















