दक्षिण सोलापूर तालुक्यातील आचेगाव इथल्या जयहिंद साखर कारखान्याचे युवा चेअरमन तथा नुकतेच काँग्रेस पक्षात प्रवेश केलेले युवानेते गणेश माने देशमुख हे कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत साखर कारखानदारी तसेच हॉटेल व्यवसाय यामुळे त्यांना कायम पुणे मुंबई ला जावे लागते , सध्या महाराष्ट्रात कोरूना चे रुग्ण वाढत असल्याने खबरदारी म्हणून त्यांनी आपली कोरोना चाचणी केली असता त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला मात्र लक्षणे नसल्याने ते होम आयसोलेट झाले आहेत आपल्या संपर्कात आलेल्या सर्व ज्येष्ठ मान्यवर तसेच कार्यकर्त्यांना त्यांनी आपली कोरोना चाचणी करण्याचे आवाहन केले आहे नुकतेच त्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा प्रमुख उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून त्यांनी आपली तयारी सुरू केल्याचे चित्र आहे.



















