कराड (प्रतिनिधी) कराड शहरातील कदम हॉस्पिटल व लेपोर्स्कोपी सेंटर मध्ये अत्यंत गुंतागुंतीची पहिली शस्त्रक्रिया यशस्वी झाली. ही शस्त्रक्रिया डॉ दिग्विजय कदम आणि डॉ आशिष शिंदे यांनी केली. शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याबद्दल संबंधित रुग्णाचे नातेवाईक आणि हॉस्पिटलच्या स्टाफने डॉक्टरांचे अभिनंदन केले.
कदम हॉस्पिटलमध्ये डॉ दिग्विजय कदम, डॉ अश्विनी कदम व डॉ आशिष शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अत्याधुनिक उपकरणांसह नॉर्मल डिलिव्हरी, सिझेरीयन डिलेव्हरी, वेदनारहीत प्रसुती, सोनोग्राफी, एनएसटी, गर्भसंस्कार, योगा, वंध्यत्व निवारण केंद्र, दुर्बिणीव्दारे होणाऱ्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, स्तनाचे आजार, निदान व उपचार, पोटाचे सर्व आजार, निदान व उपचार या सुविधा उपलब्ध आहेत.

















