सोलापूर : करमाळा पंचायत समितीच्या उपसभापतीपदी माजी आमदार नारायण पाटील गटाच्या केशर चौधरी यांची गुरुवारी बिनविरोध निवड झाली आहे.
शिवसेनेचे माजी आमदार नारायण पाटील यांच्या पाटील गटातून चिखलठाण गणाचे सदस्य आणि माजी उपसभापती दत्तात्रय सरडे यांनी काही दिवसांपूर्वी राजीनामा दिला होता त्यांच्या रिक्त झालेल्या जागी वांगी गणाच्या सदस्या केशर चौधरी यांची उपसभापती पदी बिनविरोध निवड झाली.
चार महिन्यांपूर्वी माजी सभापती गहिनीनाथ ननवरे यांनी राजीनामा दिल्यानंतर झालेल्या सभापती निवडणूकीत अतुल पाटील यांची बिनविरोध निवड झाली होती.
नसध्या करमाळा पंचायत समितीवर पाटील गटाची एक हाती सत्ता आहे. या निवडीबद्दल माजी आमदार नारायण पाटील यांचे चिरंजीव पृथ्वीराज पाटील यांनी चौधरी यांचा सत्कार केला. पाटील गटाने यावेळी हालगीच्या कडकडाटात आनंदोत्सव साजरा करण्यात आला.यावेळी
सभापती अतुल पाटील, माजी उपसभापती दत्तात्रय सरडे,माजी सभापती शेखर गाडे गहिनीनाथ ननवरे,जिल्हा परिषद सदस्य बिभीषण आवटे सर्व पंचायत समिती सदस्य व तालुक्यातील पाटील गटाचे कार्यकर्ते व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.यावेळी करमाळा पंचायत समितीचे सभापती अतुल पाटील व माजी उपसभापती दत्तात्रय सरडे यांनी निवडीविषयी व पाटील गटविषयी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

















