मोची समाजाचे युवा नेते, सामाजिक कार्यकर्ते करण म्हेत्रे यांच्या मृत्यूनंतर निघालेल्या अंतयात्रेला हजारोंचा जनसमुदाय उसळला होता यामध्ये पोलिसांनी अटकाव केल्यानंतर काहीसा गोंधळ उडाला आणि संतप्त झालेल्या युवा कार्यकर्त्यांनी पोलिसांना धक्काबुक्की केली यानंतर अशा वातावरणातच आणि हजारोंच्या उपस्थितीत करण म्हेत्रे यांचा अंत्यविधी झाला त्यानंतर पोलिस प्रशासनाने सुमारे अडीचशे जणांवर गुन्हा दाखल केला, त्यामध्ये 88 युवकांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते, त्यापैकी 50 जणांचा अंतरिम जामीन मंजूर झाला होता, आता त्यापैकी 38 जणांचा जामीन मंजूर झाला आहे, आरोपीचे वकील ऍड अमित आळंगे यांनी माहिती दिली, यामध्ये आरोपींच्या जामीनाची जबाबदारी आमदार प्रणिती शिंदे यांनी घेतली होती. ऍड राहुल गायकवाड, ऍड शुभम माने , यांनी तर सरकारच्या वतीने ऍड दत्तूसिंग पवार यांनी काम पाहिले.

















