सोलापूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रकाश वाले यांच्या नेतृत्वाखाली मोची समाज जिल्हाध्यक्ष देवेंद्र भंडारे उपाध्यक्ष नागनाथ कासलोलकर दिनेश म्हेत्रे आदीच्या उपस्थितीत पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांना निवेदन देण्यात आले.
मागासवर्गीय मोची समाजातील सामाजिक कार्यकर्ते करण म्हेत्रे यांच्या अंत्ययात्रेत सहभागी झालेल्या मोची समाज बांधवांवर ३५३ कलम गुन्हा दाखल झालेल्या नागरीकावरील कलम रद्द करावे अशी मागणी केली, मोची समाजातील करण म्हेत्रे हे दानशूर व्यक्तिमत्व होतं तो नेहमी गरिबांना मदत करीत होता, ताडीच्या विरोधात जनआंदोलन उभे केले होते, तरुणांना निरोगी राहण्यासाठी स्वतः पैसे खर्च करून त्याने व्यायामशाळा बांधली आहे. त्यांचा जनसंपर्क दांडगा असल्याने त्यांच्या अंत्यविधीला युवकांची एवढी मोठी गर्दी झाली होती मात्र पोलिसांनी त्या अंत्ययात्रेत सहभागी झालेल्या काही कार्यकर्ते आणि युवकांवर 353 कलम अन्वये गुन्हा दाखल केला आहे तो मागे घ्यावा अशी मागणी प्रकाश वाले तसेच मोची समाजाच्या वतीने करण्यात आली


















