मोची समाजातील युवा नेतृत्व, काँग्रेसचे नेते, उद्योजक करण अण्णा म्हेत्रे यांचे शनिवारी निधन झाले होते त्यांच्या निधनाने संपूर्ण सोलापूर शहरावर शोककळा पसरली होती त्यांचा मित्रपरिवार, मोची समाजातील युवावर्ग यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. शनिवारी पाचच्या दरम्यान करण म्हेत्रेत्रे यांचा मृत्यू झाला मात्र त्यांची अंत्ययात्रा रविवारी सकाळी अकरा वाजता मोची गल्लीतील राहत्या घरातून निघाली सोलापूर शहरात कोरूनाचा संसर्ग पाहता पंधरा दिवस संचारबंदी वाढवली आहे कडक असे निर्बंध घालण्यात आले आहेत, चार ते पाच व्यक्ती एका ठिकाणी दिसले की त्यांच्यावर कारवाई होते मात्र करण म्हेत्रे यांच्या अंत्ययात्रेला हजारोंचा जनसमुदाय उसळला ही बोलावलेली गर्दी नव्हती किंवा कुणी जमा केलेली गर्दी नव्हती कारण म्हेत्रे यांच्यावर प्रेम करणारा वर्ग या अंत्ययात्रेत सहभागी झाला होता. पोलीस प्रशासनाने जन् माणसांच्या भावना ओळखून मोठ्या मनाने कुणाला ही अडवणूक केली नाही, आणि या अंतयात्रेला सहकार्य केले, जांबमुनी चौक, मौलाली चौक, लष्कर ,सात रस्ता या मार्गावरून ही अंत्ययात्रा मोदी स्मशानभूमीत आली या अंत्ययात्रेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुधीर खरटमल जॉन फुलारे हनुमंत सायबोळू, अंबादास करगुळे, गणेश डोंगरे ,अब्राहम कुमार, यल्लाप्पा तूपदोळकर यांच्यासह हजारोंच्या संख्येने विविध पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते समाजातील युवक महिला मोठ्या संख्येने अंत्ययात्रेत सहभागी झाले होते मोठ्या साश्रुनयनांनी करण म्हेत्रे यांना निरोप देण्यात आला.



















