सोलापूर : कंबर तलाव जवळ दुचाकी रस्त्याच्या मध्ये असलेल्या दुभाजकाला धडकून झालेल्या अपघातात दोन युवक जखमी झाले त्यापैकी एक जण गंभीर असून या दोन्ही युवकांना या ठिकाणी बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांनी तातडीने ॲम्बुलन्स मध्ये घालून पुढील उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलकडे पाठवले.
सोलापूरच्या संभाजी तलावाजवळ गणेश विसर्जनाची लगबग सुरू असताना दुपारी दीडच्या सुमारास MH 13 DZ 6797 हे इलेक्ट्रिक दुचाकी वाहन वेगाने येऊन रस्त्याच्या मध्ये असलेल्या दुभाजकाला धडकले आणि त्यावेळी दुचाकी वरील दोन युवक खाली पडून गंभीर जखमी झाले. त्यामध्ये दोघांनाही मार लागला असून एक जण जागेवरच बेशुद्ध झाले. अपघात घडताच या ठिकाणी बंदोबस्ताला असलेल्या सहाय्यक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे यांनी तातडीने ऍम्ब्युलन्स मागून घेतली. त्यामध्ये जखमी दोघांना पुढील उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटल कडे पाठवून देण्यात आले. जखमी दोन्ही युवकांची नावे मात्र समजू शकली नाहीत. या अपघाता वेळी पोलिसांची तत्परता दिसून आली.