दक्षिण सोलापूर तालुक्यातील माळकवडे येथील शेतकरी उमेश वाघमारे यांनी आपल्या साडेचार एकरावती पपईची लागवड केली होती. फळाची वाढ व्हावी, फुले गळू नये आदीसाठी मंद्रप येथील बिराजदार कृषि केंद्रातून औषधे आणून फवारणी केली असता उलट संपूर्ण पपई बागच करपली असून फुले, फळे, पाला आदी गळाली असून संपूर्ण बागच उद्धस्थ झालेली आहे. त्यामुळे अख्खे वाघमारे कुटुंबच रस्त्यावर आलेले आहे.
यांची तक्रार सबंधित बिराजदार कृषि केंद्र चालक यांना सांगून सुद्धा काडी मात्र दखल घेतली नाही. नाईलास्तव जिल्हा कृषि अधिकारी दत्तात्रय गवसाने व तालुका कृषि अधिकारी माळी यांच्याकडे रितसर तक्रार अर्ज दाखल केला असून लवकरात लवकर मला न्याय देण्यात यावा नाहीतर जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयासमोर कुटुंबासह उपोषण बसणार असल्याचा इशारा उमेश वाघमारे यांनी दिला आहे.